Join us  

जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:02 PM

mutual funds buys more than १४ crore suzlon energy share in may

म्युच्युअल फंडांनी मे महिन्यात सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. म्यूचुअल फंडांनी मे महिन्यात या विंड अँड सोलर एनर्जी कंपनीचे तब्बल १४.२१ कोटी शेअर खरेदी केले. ३१ मे २०२४ च्या अखेरपर्यंत म्यूच्युअल फंडांकडे सुझलॉन एनर्जीचे एकूण ४५.०३ कोटी शेअर झाले आहेत. ३० एप्रिल २०२४ अखेरपर्यंत म्यूच्युअल फंडांकडे सुझलॉन एनर्जीचे एकूण ३०.८१ कोटी शेअर होते. इकनॉमिक टाइम्सने नुवामाच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ५०.२५ रुपयांवर ट्रेड करत आहेत.

HSBC म्यूच्युअल फंडने खरेदी केले २.५५ कोटी शेअर -सुझलॉन एनर्जीचे शेअर अॅक्सिस म्युच्युअल फंडसाठी टॉप न्यू एंट्री होते. तर HSBC म्युच्युअल फंडने सुझलॉन एनर्जीचे जवळपास २.५५ कोटी शेअर खरेदी केले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार हे शेअर अंदाचे १२१ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. गेल्या मे महिन्यात सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तर, यावर्षात आतापर्यंत सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३१ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

एप्रिल, मे महिन्यात २० कोटी शेअर खरेदी केले -BSE वर उपलब्ध शेअरहोल्डिंग डेटानुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल फंडांचा सुझलॉन एनर्जीमध्ये १.८६% एवढा वाटा होता. म्युच्युअल फंडांकडे २५.२६ कोटींहून अधिक शेअर्स होते. जून तिमाहीचा शेअरहोल्डिंग डेटा जुलै महिन्यात घोषित केला जाईल. म्युच्युअल फंडांनी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सुझलॉन एनर्जीचे सुमारे २० कोटी शेअर्स खरेदी केले आहेत.

सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात २४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर १४ जून २०२३ रोजी १४.४१ रुपयांवर होता. तो १४ जून २०२४ रोजी ५० रुपयांच्याही पुढे गेला आहे. गेल्या २ वर्षांत कंपनीच्या शेअमध्ये  ६१३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक