जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणं खूप गरजेचं आहे. नोकरी आणि व्यवसाय करणारे बहुतेक लोक त्यांचे पैसे एफडीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. एफडी हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही. यामुळे, बहुतेक लोक निश्चितपणे एफडी करून घेतात. पण आता अनेकजण SIP कडे गुंतवणुकीचं साधन म्हणून पाहत आहेत. चांगल्या परताव्यासाठी अनेकांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलंय. यामध्ये तुम्हाला मिळणारा परतावा आणि तुमची गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते.
एसआयपीमध्ये नेहमीच धोका असतो. अनेक कंपन्यांचे म्युच्युअल फंड आहेत. अशा परिस्थितीत बंपर परताव्यासाठी कुठे गुंतवणूक करावी हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. ज्यांनी या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली ते आज कोट्यधीश झाले आहेत.
गुंतवणूकदार कोट्यधीश
आम्ही ज्या म्युच्युअल फंडाबद्दल तुम्हाला सांगत आहोत, तो म्युच्युअल फंड म्हणजे एचडीएफसी टॉप १०० आहे. कंपनीनं यात सातत्यानं गुंतवणूक करणाऱ्यांना कोट्यधीश बनवलंय. यातील गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळालाय. एचडीएफसी टॉप १०० फंडात महिन्याला १० हजारांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना २० वर्षांमध्ये जवळपास ६.८८ कोटी रुपयांचा परतावा मिळालाय. कंपनी बहुतेक गुंतवणूक लार्ज कॅपमध्येच करते.
१४ टक्क्यांचे रिटर्न
एचडीएफसी टॉप १०० फंड लाँच होऊन २७ वर्षे झाली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना १४ टक्क्यांपर्यंत बंपर परतावा मिळाला आहे. कंपनीनं आपल्या पोर्टफोलिओपैकी ८० टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केली आहे.
(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)