Join us

कमाईची मोठी संधी! Gold ETF मध्ये ₹५००० पासून करू शकता गुंतवणूक; पाहा स्कीम डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:31 PM

ही एक ओपन-एंडेड गोल्ड ईटीएफ स्कीम आहे.

NFO Alert: असेट्स मॅनेजमेंट कंपनी बडोदा BNP परिबा म्युच्युअल फंडाची (Baroda BNP Paribas Mutual Fund) नवी स्कीम बडोदा बीएनपी पारिबा गोल्डच्या ईटीएफचं (Baroda BNP Paribas Gold ETF) सबस्क्रिप्शन खुलं झालंय. नवीन फंड ऑफर (NFO) ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुली आहे. ही एक ओपन-एंडेड गोल्ड ईटीएफ स्कीम आहे. असेट्स मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार योजनेतील गुंतवणूकदार फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करून देशांतर्गत बाजारातील किमतींच्या आधारे परतावा मिळवू शकतात.

₹५००० पासून सुरुवातबडोदा BNP परिबा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक किमान ५००० रुपयांनी सुरू केली जाऊ शकते. यानंतर, रक्कम १ रुपयांच्या पटीत गुंतविली जाऊ शकते. ईटीएफचं लिस्टिंग वाटपाच्या तारखेपासून १० वर्किग डे च्या आत स्टॉक एक्सचेंजवर असेल. ही स्कीम अलॉटमेंटच्या तारखेपासून ५ दिवसांनी पुन्हा सुरू होईल. फंडचं व्यवस्थापन बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर विष्णू सोनी करणार आहेत.काय आहे विशेष?

  • गोल्ड ईटीएफ हा गुंतवणुकीसाठी तुलनेनं कमी किमतीचा आणि सोपा पर्याय आहे कारण तो स्टॉक एक्स्चेंजवरील शेअर्सप्रमाणेच खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा देतो.
  • गोल्ड ईटीएफमध्ये प्रत्यक्ष सोनं ठेवण्याच्या तुलनेत चोरीचा धोका नाही, कारण गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये ठेवल्या जातात.
  • सोन्याची शुद्धता कमी होण्याचा धोका नाही.
  • खरेदी आणि विक्री दरम्यान पारदर्शक किंमत आणि लिक्विडिटी.
  • तुम्ही गोल्ड ईटीएफ मध्ये १ युनिट देखील गुंतवू शकता, १ युनिट म्हणजे सुमारे ०.०१ ग्रॅम सोनं.

(टीप : यामध्ये स्कीमची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक