Lokmat Money >म्युच्युअल फंड > SIP Calculation : दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित

SIP Calculation : दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित

छोटी गुंतवणूक करूनही तुम्ही काही वर्षांमध्ये कोट्यवधींचा फंड तयार करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:16 PM2023-07-20T13:16:06+5:302023-07-20T13:16:48+5:30

छोटी गुंतवणूक करूनही तुम्ही काही वर्षांमध्ये कोट्यवधींचा फंड तयार करू शकता.

By saving rs 100 daily you can create a fund of 1 crore see simple calculation mutual fund investment market risk huge returns | SIP Calculation : दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित

SIP Calculation : दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित

SIP Calculation : आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ते एका दिवसात होणं शक्य नाही. जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होऊ शकता. उत्तम परताव्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक उत्तम मानली जाते. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे. जून 2023 मध्ये देखील एसआयपीच्या माध्यमातून 14 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आली आहे.

एसआयपी हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित छोट्या बचतींमधूनही इक्विटी सारखे परतावे मिळवू शकता. जर तुम्ही छोट्या बचतीत दर महिन्याला गुंतवणूक सवय लावली तर तुम्ही पुढील काही वर्षांमध्ये लाखो आणि कोट्यवधीचा निधी तयार करू शकता. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवत असाल आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला तर तुम्ही 30 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.

दररोज वाचवा 100 रुपये
समजा तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुमची दरमहा 3000 रुपयांची बचत होईल. जर तुम्ही दरमहा 3000 रुपयांची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा देखील मिळत असेल, तर तुम्ही 30 वर्षात 1,05,89,741 रुपयांचा निधी तयार करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 10,80,000 रुपये असेल. तर, अंदाजे वेल्थ गेन 95,09,741 रुपये असेल. परंतु एसआयपीतील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच यामध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही. बाजारातील चढ-उतारानुसार तुमचा परतावा कमी-अधिक असू शकतो.

डेली एसआयपीचाही पर्याय
बहुतेक म्युच्युअल फंड हाऊस आता गुंतवणूकदारांना डेली एसआयपीचा पर्याय देतात. ही अशी सुविधा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दररोज त्यांच्या आवडीच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे याद्वारे दररोज किमान 100 रुपयांची गुंतवणूक करता येते. दैनंदिन एसआयपी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढण्यात आणि त्यांच्या गुंतवणुकीवरील बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यात मदत करतात. एसआयपीमध्ये धोका असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक ठरवावी.

(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाविषयी सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: By saving rs 100 daily you can create a fund of 1 crore see simple calculation mutual fund investment market risk huge returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.