लोकमत न्यूज नेटवर्क : सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून छोट्या छोट्या रकमा म्युच्युअल फंड अथवा अन्य बचत योजनांत नियमितपणे गुंतविल्यास दीर्घ कालावधीत मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, थेट समभागांत (इक्विटी) पैसे लावण्याच्या तुलनेत हा एक सुरक्षित पर्याय आहे. एसआयपी टॉप-अपमध्ये दरवर्षी केवळ १० टक्के वाढ केली तरी गुंतवणूकदारास दुप्पट परतावा मिळू शकतो.
किती पैसे जमवायवे आपल्या हाती
एसआयपीची चांगली बाब ही आहे की, पाहिजे तेव्हा एसआयपी रक्कम कमी-जास्त करू शकता. हा पर्याय प्लॅन सुरू करण्याच्या आधीच निवडायचा असतो. सॅलरी अथवा उत्पन्नात वाढ झाल्यास एसआयपीची रक्कम वाढविणे सोपे होते. यातून मॅच्युरिटीवेळी नियमित एसआयपीपेक्षा सुमारे दुप्पट परतावा मिळतो.
नेमके गणित काय?
एसआयपी टॉप-अपच्या माध्यमातून दरवर्षी १० टक्के गुंतवणूक वाढविल्यास २० वर्षांत गुंतवणुकीत २२.३७ लाख रुपयांची वाढ होताना दिसत आहे. तथापि, परतावा पाहिल्यास नियमित एसआयपीच्या तुलनेत तो तब्बल ४४ लाख रुपये अधिक आहे. म्हणजेच गुंतवणुकीत दरवर्षी केवळ १० टक्के वाढ केल्यानंतर नियमित एसआयपीच्या तुलनेत एसआयपी टॉप-अपद्वारे मिळणारा लाभ दुप्पट जास्त आहे.
गुंतवणूक वाढविण्याची सोय
एखादी व्यक्ती २० वर्षांसाठी गुंतवणूक करीत असेल आणि त्याने दरवर्षी टॉप-अपच्या माध्यमातून केवळ १० टक्के गुंतवणूक वाढविली असेल, तर त्यास नियमित एसआयपीच्या तुलनेत दुप्पट परतावा मिळेल. म्युच्युअल फंड कंपन्या एसआयपी टॉप-अपचा पर्याय वेळोवेळी मासिक गुंतवणूक वाढविण्यासाठी देत असतात.
एसआयपी परताव्याची तुलना
तपशील नियमित एसआयपी एसआयपी टॉप-अप
मासिक एसआयपी ५,००० ५०००
कालावधी २० वर्षे २० वर्षे
अंदाजे परतावा १२ टक्के १२ टक्के
दरवर्षी टॉप-अप ० १० टक्के
एकूण गुंतवणूक १२ लाख ३४.३७ लाख
परिपक्तवा रक्कम ४९.९५ लाख ९३.५५ लाख
लाभ ३७.९६ लाख ५९.१८ लाख