Lokmat Money >म्युच्युअल फंड > NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NRI Mutual Fund Investment: भारतीयांसोबतच त्यामुळेच अनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण अनिवासी भारतीय भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? याचं उत्तर जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:34 IST2025-01-08T10:34:41+5:302025-01-08T10:34:41+5:30

NRI Mutual Fund Investment: भारतीयांसोबतच त्यामुळेच अनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण अनिवासी भारतीय भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? याचं उत्तर जाणून घेऊ.

Can NRIs invest in mutual funds What are the rules know the complete information | NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mutual Fund Investment : हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करत आहेत. बहुतांश लोक गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळताना दिसताहेत. यामध्ये जोखीम जरी अधिक असली तरी यात मिळणारा परतावा हा अधिक असतो. त्यामुळेच भारतीयांसोबतच त्यामुळेच अनिवासी भारतीयांनाही यात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण अनिवासी भारतीय भारतात म्युच्युअल फंडात (Mutual Fund Investment) गुंतवणूक करू शकतात का? तर याचं उत्तर आहे, होय. पण त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अनिवासी भारतीय (एनआरआय) हे ते भारतीय नागरिक आहेत जे एका आर्थिक वर्षात १८२ दिवसांपेक्षा कमी काळ भारतात राहतात.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं (फेमा) पालन केल्यास अनिवासी भारतीय भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. फेमा कायद्यानुसार, अनिवासी भारतीय आपला निधी नियमित बचत खात्यात ठेवू शकत नाहीत. अनेक एएमसी अनिवासी भारतीयांसाठी हायब्रीड, इक्विटी आणि हायब्रीड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय देतात. टाटा कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, भारतातील अनेक एएमसी आणि फंड हाऊस कॅनडा आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची परवानगी देत नाहीत. हे फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लायंस अॅक्ट (FACTA) अंतर्गत असलेल्या आवश्यकतांमुळे आहे.

गुंतवणूकीच्या पद्धती?

गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत, जसं की ऑनलाइन किंवा पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे. परंतु बऱ्याच एएमसी परदेशी चलनात गुंतवणुकीस परवानगी देत नाहीत. या कारणास्तव, त्यांनी खालीलपैकी एक खातं उघडलं पाहिजे. एक अनिवासी बाह्य (एनआरई) खातं आहे. एनआरई खातं अनिवासी भारतीयांना त्यांचं परदेशी उत्पन्न भारतीय म्युच्युअल फंडात गुंतविण्यास मदत करतं. 

दुसरं म्हणजे अनिवासी साधारण (एनआरओ)- एनआरओ खाती अनिवासी भारतीयांच्या नावानं भारतीय बँकांमध्ये उघडली जातात. टाटा कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, अनिवासी भारतीयांनी कमावलेल्या कोणत्याही भारतीय उत्पन्नाचं व्यवस्थापन बँक करते. एनआरओ किंवा एनआरई खाते उघडल्यानंतर अनिवासी भारतीय खालील पद्धतींचा वापर करून भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात.

अशा प्रकारे करू शकता गुंतवणूक

एक तर, अनिवासी भारतीय त्यांच्या एनआरई किंवा एनआरओ खात्यांद्वारे नियमित बँकिंग चॅनेलचा वापर करून भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये थेट गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट आणि परदेशी वास्तव्याचा पुरावा अशी आवश्यक केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील.

दुसरं म्हणजे अनिवासी भारतीयांसाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पॉवर ऑफ अॅटर्नीच्या (पीओए) माध्यमातूनही करता येते. क्रेडिट एएमसी पीओएला केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एनआरआयच्या वतीनं गुंतवणूक करण्याची परवानगी देते आणि गुंतवणूकदार आणि पीओएनं भारतीय म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केवायसी कागदपत्रांवर स्वाक्षरी करणं आवश्यक आहे.

Web Title: Can NRIs invest in mutual funds What are the rules know the complete information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.