मुंबई : वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये लोकांची बचत २०२०-२१ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी घटली असतानाही म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये भारतीय कुटुंबांची गुंतवणूक ३१.६१ लाख कोटी रुपयांवरून घटून २५.६० लाख कोटी रुपयांवर आली. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक मात्र १५० टक्क्यांनी वाढून १.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. २०२०-२१ मध्ये ती फक्त ६४,०८५ कोटी रुपये होती. जीवन विमा आणि इतर गुंतवणुकीतही घट झाली आहे. लोकांनी छोट्या याेजनांत आपली गुंतवणूक वाढवली आहे.
- ४४% घटल्या बँकांच्या ठेवी. २१.७% घटली जीवन विम्यातील गुंतवणूक.
- १७% वाढली अल्प बचत योजनांची गुंतवणूक.