Join us

जीवन विमा, इतर गुंतणुकीत घट; मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 1:30 PM

म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. 

मुंबई :  वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये लोकांची बचत २०२०-२१ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी घटली असतानाही म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये भारतीय कुटुंबांची गुंतवणूक ३१.६१ लाख कोटी रुपयांवरून घटून २५.६० लाख कोटी रुपयांवर आली. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक मात्र १५० टक्क्यांनी वाढून १.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. २०२०-२१ मध्ये ती फक्त ६४,०८५ कोटी रुपये होती. जीवन विमा आणि इतर गुंतवणुकीतही घट झाली आहे. लोकांनी छोट्या याेजनांत आपली गुंतवणूक वाढवली आहे. 

  • ४४% घटल्या बँकांच्या ठेवी. २१.७% घटली जीवन विम्यातील गुंतवणूक. 
  • १७% वाढली अल्प बचत योजनांची गुंतवणूक.
टॅग्स :गुंतवणूक