Join us

तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 9:52 AM

Mutual Fund Investment : पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहूया कोणते आहेत ते फंड्स.

Mutual Fund Investment : उत्तम परतावा मिळत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडानं यात सर्वाधिक परतावा दिलाय.

मोतीलाल ओसवालचा सर्वाधिक परतावा

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल मिडकॅप फंडानं एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर पाच वर्षांच्या कालावधीत ३९.८३ टक्के परतावा दिला आहे. तर ९ असे मिडकॅप म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी ३० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिलाय. एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी मोतीलाल ओसवाल मिडकॅप म्युच्युअल फंड योजनेत दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती, तर त्याची गुंतवणूक १५.७४ लाख रुपये झाली असती.

'यांनी' दिला ३०% पेक्षा अधिक परतावा

यानंतर निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडानं पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना ३३.३५ परतावा दिला आहे, तर एडलवाइज मिड कॅप फंडात जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी १० हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असेल तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य ऑक्टोबर २०२४ पर्यंत १३,५२,९०९ रुपये झालं असेल. म्हणजेच या फंडाने ३३.२७ टक्के परतावा दिला आहे.

तर क्वांट मिड कॅप फंडानं पाच वर्षांच्या कालावधीत ३३.१७ टक्के परतावा दिला आहे. कंपनीनं १० हजार रुपयांच्या एसआयपीचे रूपांतर १३,४९,६५२ रुपयांमध्ये केलं. तर एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडानं याच कालावधीत ३२.९४ रुपयांचा नफा दिला आहे. महिंद्रा मनुलाइफ आणि सुंदरम मिडकॅप फंडानं पाच वर्षांत अनुक्रमे ३१.८२ टक्के आणि ३०.२८ टक्के परतावा दिला आहे, तर इन्वेस्को इंडियाने या कालावधीत एसआयपी गुंतवणुकीवर ३०.२६ टक्के परतावा दिला.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिवरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा