Lokmat Money >म्युच्युअल फंड > Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक

Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक

म्युच्युअल फंड हाऊस युटीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये एक नवीन सेक्टरल फंड (NFO) आणला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:13 PM2023-09-25T14:13:03+5:302023-09-25T14:13:17+5:30

म्युच्युअल फंड हाऊस युटीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये एक नवीन सेक्टरल फंड (NFO) आणला आहे.

Earning Opportunity from Mutual Fund! New fund opened from today, you can invest from ₹1000 | Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक

Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक

UTI Mutual Fund NFO: म्युच्युअल फंड हाऊस युटीआय म्युच्युअल फंडाने (UTI Mutual Fund) इक्विटी सेगमेंटमध्ये एक नवीन सेक्टरल फंड (NFO) आणला आहे. फंड हाऊसच्या एनएफओ युटीआय इनोव्हेशन फंडाची (UTI Innovation Fun) सबस्क्रिप्शन २५ सप्टेंबरपासून सुरू झालं आहे. गुंतवणूकदार या स्कीमसाठी ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. ही एक ओपन एंडेड स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा रिडम्प्शन करू शकतात. असेट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मते, लाँग टर्म कॅपिटल अॅप्रिसिएशनसाठी फायद्याचं ठरू शकतं.

₹५००० पासून गुंतवणूक
युटीआय म्युच्युअल फंडानुसार UTI Innovation Fund मध्ये किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. युटीआय इनोव्हेशन फंडाचा बेंचमार्क NIFTY 500 TRI आहे. अंकित अग्रवाल हे या स्कीमचे फंड मॅनेजर आहेत.

कोण करू शकतं गुंतवणूक?
म्युच्युअल फंड हाऊसनुसार, ज्यांना मीडियम ते लाँग टर्ममध्ये कॅपिटल अॅप्रिसिएशन हवंय, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. या शिवाय स्कीममध्ये गुंतवणूकदारांना इनोव्हेशन थीमवप इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रूमेंर्समध्ये गुंतवणूकीची संधी मिळणार आहे. १८ ऑक्टोबरपासून ही स्कीम पुन्हा खुली होणार आहे.

(टीप - यामध्ये एनएफओबद्दल माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Earning Opportunity from Mutual Fund! New fund opened from today, you can invest from ₹1000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.