Join us  

इक्विटी म्युच्युअल फंडच वाढविणार माझी बचत! जून तिमाहीत गुंतवणूक ९४,१५१ कोटी रुपयांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 8:20 AM

या काळात गुंतवणूकदारांचे प्रमाण तीन कोटींनी वाढले आहे; तर फोलिओंची संख्या वाढून १३.३ कोटींवर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गुंतवणुकीत जोरदार परतावा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये झालेली गुंतवणूक पाचपट वाढून ९४,१५१ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. 

मागील वर्षी याच समान कालावधीत इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक १८,३५८ कोटी इतकी होती. अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती, सरकारची अनुकूल धोरणे आणि शेअर बाजारावर वाढलेला विश्वास या कारणांमुळे लोकांचा इक्विटी म्युच्युअल फंडावर विश्वास वाढल्याचे दिसत आहे. इक्विटी फोलिओंची संख्या वाढल्याने विविध पर्यायांमध्ये केली जाणारी गुंतवणूक अधिक विस्तारताना दिसत आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता ५९% वाढली

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये या उद्योगात एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता (एयूएम) ५९ टक्क्यांनी वाढून २७.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी ही मालमत्ता १७.४३ लाख कोटी रुपये इतकी होती. या काळात गुंतवणूकदारांचे प्रमाण तीन कोटींनी वाढले आहे; तर फोलिओंची संख्या वाढून १३.३ कोटींवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :गुंतवणूक