देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आता म्युच्युअल फंड क्षेत्रात आपला वाटा वेगानं वाढवत आहे. या आठवड्यात दोन इक्विटी इंडेक्स फंडांच्या घोषणेनंतर, एसबीआय म्युच्युअल फंडने पॅसिव्ह सेगमेंटमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी तीन टार्गेट मॅच्युरिटी फंड (TMF) लाँच करण्याची घोषणा केली. SBI CRUSIL IBX गिल्ट इंडेक्स - जून 2036 फंड, SBI CRUSIL IBX गिल्ट इंडेक्स - एप्रिल 2029 फंड आणि SBI CRISIL IBX SDL इंडेक्स - सप्टेंबर 2027 फंड, असे हे तीन फंड आणले आहेत. दिनेश आहुजा यांना या योजनांचे निधी व्यवस्थापक करण्यात आलं आहे.
टार्गेट मॅच्युरिटी फंड डेट ही म्युच्युअल फंडांची एक श्रेणी आहे ज्याची एक निश्चित मुदत असते. याद्वारे अंडरलाइन इंडेक्समध्ये समाविष्ट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करता येते. हे फंड प्रामुख्याने सरकारी सिक्युरिटीज, एएए रेटेड सिक्युरिटीज आणि पीएसयू बाँड्स सारख्या उच्च रेट केलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात.
SBI MF चे डेप्युटी एमडी आणि चीफ बिझनेस ऑफिसर डीपी सिंग म्हणाले की, सध्याच्या वाढत्या व्याजदरांमध्ये गुंतवणूकदारांसाठी टीएमएफ हा एक चांगला पर्याय आहे. कारण हे फंड गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी देत आहेत. याशिवाय, जर गुंतवणूकदाराने फंडाच्या मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक केली तर ते व्याजदरांच्या चक्रातील बदलांशी संबंधित जोखीम व्यवस्थापित करण्यात देखील मदत करू शकते. या फंडांमध्ये पारंपारिक गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक लिक्विडिटी असते कारण गुंतवणूकदारांना कोणत्याही वेळी योजनेत प्रवेश करण्याची आणि बाहेर पडण्याची सुविधा असते. इंडेक्सेशन बेनिफिटमुळे हे फंड चांगले कर परतावा देतात. या योजनांद्वारे किमान 95% आणि जास्तीत जास्त 100% गुंतवणूक करता येऊ शकेल.
TMF गुंतवणूकदारांना कधीही गुंतवणूक किंवा पैसे काढू देतं. या फंडांवर मिळणाऱ्या परताव्याचा अंदाज लावता येतो. TMF गुंतवणूकदारांना व्याजदराच्या जोखमीपासून संरक्षण देखील करतं. SBI CRISIL IBX गिल्ट इंडेक्स - जून 2036 फंड ऑफर 22 सप्टेंबर रोजी उघडेल आणि 28 सप्टेंबर रोजी बंद होईल. SBI CRISIL IBX गिल्ट इंडेक्स - एप्रिल 2029 फंड आणि SBI CRISIL IBX SDL इंडेक्स सप्टेंबर 2027 फंडासाठी NFO 26 सप्टेंबर रोजी उघडेल आणि 3 ऑक्टोबर रोजी बंद होईल.