जे गुंतवणूकदारशेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे टाळतात अशांसाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडचा फायदा हा केवळ दीर्घ मुदतीतच मिळतो, असे दिसून येते. ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट (ICICI Prudential Multi-Asset) म्युच्युअल फंडने दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे नशीबच बदलले आहे. यात SIP च्या माध्यमाने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता कोट्यधीश झाले आहेत.
ICICI Prudential Multi-Asset फंड 20 वर्षांपूर्वी 21 ऑक्टोबर 2002 रोजी लॉन्च झाला होता. 3 नोव्हेबंर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडाचा कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR) 21.21 टक्के होता. ज्याने कुणी 2002 मध्ये या फंडात 10 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू केली असेल, आतापर्यंत त्याचा परतावा 1.8 कोटी रुपये झाला असेल. महत्वाचे म्हणजे, व्हॅल्यू रिसर्चने या फंडाला 4 स्टार रेटिंग दिली आहे.
असा आहे परफॉर्मन्स -
ICICI Prudential Multi-Asset फंडने 10 हजार रुपयांच्या मंथली एसआयपीवर 20 वर्षांत 1.8 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 हजार रुपयांच्या एसआयपीला 10 वर्षांपूर्वी सुरुवात केली असेल, तर या फंडाने त्याचा परतावा 26 लाख रुपये केला आहे. ज्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या फंडावर विश्वास ठेवून 10 हजार रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल, त्याचा परतावा आता 9.51 लाख रुपये झाला असेल.
तसेच, 3 वर्षांत 10 हजार रुपयांच्य मंथली गुंतवणुकीने 5.17 लाख रुपयांचा फंड जनरेट केला आहे. गेल्या काही वर्षांतील ट्रेंड पाहिल्यास ICICI Prudential Multi-Asset फंडने दर दीन वर्षांनी गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत.