Join us

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 9:35 AM

Mutual Fund Investment : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

Mutual Fund Investment : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आधार येण्यापूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांना आपलं केवायसी अपडेट करून घ्यावं लागणार आहे. त्यावेळी त्यांनी अॅड्रेस प्रूफ म्हणून बँक अकाऊंट किंवा युटिलिटी बिल जमा केलं होतं, परंतु आपल्या पोर्टफोलियोत १२ अंकी डिजिटल नॅशनल आयडेंटीटी नंबर जोडला नसेल, म्हणजेच आधार नंबर जोडला नसेल तर त्यांना आता नवीन एमएफ युनिट खरेदी करता येणार नाही. गुंतवणूकदारांना २०२४-२५ पासून म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी आधारद्वारे केवायसी करणं बंधनकारक असेल. 

बाजार नियामक सेबीनं केवायसीबाबत घालून दिलेले नवे नियम म्युच्युअल फंडांसाठी १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक आणि रिडंप्शन सुरू ठेवण्यासाठी सीएएमएस (कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस) सारख्या केआरएकडे (केवायसी नोंदणी एजन्सी) त्यांच्या स्टेटसची माहिती तपासणं आवश्यक आहे. 

आपलं केवायसी स्टेटस तपासा 

गुंतवणूकदार आपलं केवायसी स्टेटस तपासण्यासाठी सीएएमएस, कार्वी, सीव्हीएल आणि एनडीएमएल सारख्या केआरएच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. यावरून केवायसी स्टेटस होल्डवर आहे की वैध आहे हे स्पष्ट होईल किंवा केवायसी रजिस्टर्ड किंवा व्हेरिफाईड हे समजेल. केवायसी करण्यासाठी खाली लिंक्स देण्यात आल्यात. 

https://camskra.com/https://www.karvykra.com/KYC_Validation/Default.aspxhttps://validate.cvlindia.com/CVLKRAVerification_V1/https://kra.ndml.in/ClientInitiatedKYC-webApp/#/ClientinitiatedKYC 

केवायसीसाठी वैध कागदपत्रं कोणती आहेत? 

  • आधार
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदार ओळखपत्र
  • मनरेगातर्फे देण्यात आलेले जॉब कार्ड
  • राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरद्वारे जारी केलेले एक पत्र ज्यामध्ये नाव/ पत्त्याचा तपशील असतो.
  • केंद्र सरकारन अधिसूचित केलेले इतर कोणतेही दस्तऐवज.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार