Lokmat Money >म्युच्युअल फंड > मुलांच्या नावे महिन्याला जमा करा ₹५०००, २० व्या वर्षांपर्यंत तयार होईल ५० लाखांचा फंड

मुलांच्या नावे महिन्याला जमा करा ₹५०००, २० व्या वर्षांपर्यंत तयार होईल ५० लाखांचा फंड

काही काळापासून ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, त्यामुळे लोक आर्थिक नियोजनाबाबतही अलर्ट झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 01:21 PM2023-08-27T13:21:53+5:302023-08-27T13:23:01+5:30

काही काळापासून ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, त्यामुळे लोक आर्थिक नियोजनाबाबतही अलर्ट झाले आहेत.

invest rs 5000 per month in the name of children a fund of 50 lakhs will be created by the age of 20 sip investment mutual fund | मुलांच्या नावे महिन्याला जमा करा ₹५०००, २० व्या वर्षांपर्यंत तयार होईल ५० लाखांचा फंड

मुलांच्या नावे महिन्याला जमा करा ₹५०००, २० व्या वर्षांपर्यंत तयार होईल ५० लाखांचा फंड

काही काळापासून ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, त्यामुळे लोक आर्थिक नियोजनाबाबतही अलर्ट झाले आहेत. आता लोक लग्न असो किंवा मुलांपासून वृद्धापकाळापर्यंत सर्व गोष्टींसाठी आर्थिक नियोजन आधीच करतात. तुम्हालाही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल, उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या जबाबदाऱ्या कोणत्याही टेन्शनशिवाय पेलवायच्या असतील, तर त्याच्या जन्मापासूनच आर्थिक नियोजन सुरू करा. जर तुम्ही त्यांच्या नावावर दरमहा ५,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली, तर तुमचे मूल २० वर्षांचे होईपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी ५०,०००,०० पर्यंतचा निधी सहज तयार करू शकता. पाहूया हे कसं शक्य आहे.

एसआयपीनं बनेल पैसा
आजच्या काळात, एसआयपी म्हणजेच Systematic Investment Plan लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता. मात्र, बाजाराशी निगडीत असल्यानं निश्चित व्याजदराची खात्री देता येत नाही. परंतु थेट बाजारात पैसे गुंतवण्यापेक्षा एसआयपी कमी धोकादायक मानली जाते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घकाळासाठी, एसआयपी तुमच्यासाठी संपत्ती तयार करण्याचं काम करते. कारण  यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. साधारणपणे, एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. यामध्ये यापेक्षा अधिक परतावाही मिळू शकतो.

पाहा गणित
समजा तुम्ही बाळाच्या जन्मासोबत ५,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि त्यात २० वर्षे सतत गुंतवणूक केली. अशा वेळी २० वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक १२,००,००० रुपये असेल, परंतु १२ टक्क्यांनुसार, तुम्हाला या गुंतवलेल्या रकमेवर ३७,९५,७४० रुपयांचं व्याज मिळेल. अशाप्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह २० वर्षांमध्ये तुम्हाला एकूण ४९,९५,७४० रुपये म्हणजेच सुमारे ५० लाख मिळतील.

दुसरीकडे, जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी ५ वर्षे म्हणजे २५ वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला ९४,८८,१७५ रुपये मिळतील. ही अशी रक्कम आहे जी तुम्हाला अन्य कोणत्याही स्कीममध्ये मिळू शकत नाही. जर तुम्हाला सुमारे १५ टक्के परतावा मिळाला तर नफा आणखी चांगला होऊ शकतो. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरपासून ते लग्नापर्यंत कुठेही वापरू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: invest rs 5000 per month in the name of children a fund of 50 lakhs will be created by the age of 20 sip investment mutual fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.