गेल्या काही महिन्यांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा कल वाढला आहे. तुम्ही स्मॉल कॅप फंडाबद्दल ऐकले असेलच. म्युच्युअल फंडाच्या स्मॉलकॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या तीन वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. मात्र, एका वर्षाच्या कालावधीतील त्यांचा परतावा चांगला नाही. याचं कारण शेअर बाजारातील घसरण आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सना बसला आहे.Small Cap म्युच्युअल फंड म्हणजे काय?स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हे असे फंड आहेत जे कमी बाजार भांडवल (Market Capitalisation) असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. शेअर बाजारात लिस्ट कंपन्यांच्या व्यवसायातील वाढीच्या शक्यतांचं आकलन करून यांची ओळख पटवली जाते. मार्केट कॅपच्या बाबतीत शेअर बाजारातील पहिल्या २५० कंपन्यांव्यतिरिक्त, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या ६५ टक्क्यांपर्यंत लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यानंतर, फंड मॅनेजर उर्वरित ३५ टक्के रक्कम मिड, लार्ज किंवा स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतो.लोकप्रिय होण्याचं कारण काय?स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सेगमेंटमध्ये, फंड व्यवस्थापकाला मोठ्या संख्येनं कंपन्यांचे शेअर्स निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. बाजार नियामक सेबीनं स्कीम कॅटेगरीतील अटी निश्चित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, फंड मॅनेजर्सकडे लार्ज कॅप आणि मिड कॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्याचे मर्यादित पर्याय आहेत.लार्ज कॅप म्युच्युअल फंड विभागात गुंतवणुकीसाठी केवळ १०० कंपन्या उपलब्ध असताना, मिड कॅप म्युच्युअल फंड विभागात १५० कंपन्या आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड विभागात गुंतवणुकीसाठी २ हजारांहून अधिक कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध आहेत.
हाय रिस्क कॅटेगरीलार्ज कॅप म्युच्युअल फंड सेगमेंटमध्ये, एकाच कंपनीला ३०-४० विश्लेषक कव्हर करतात. तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्समध्ये अनेक शेअर्स एक विश्लेषकही ट्रॅक करत नाही. स्मॉल कॅप विभागातून अल्फा जनरेट करण्यासाठी फंड व्यवस्थापकांना भरपूर वाव आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड विभाग मोठा असल्यानं फंड व्यवस्थापकांना त्यात गुंतवणूक वाढवायची असते. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ही एक हाय रिस्क मार्केट कॅटेगरी आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)