Join us

स्मॉलकॅप फंडावरच गुंतवणूकदारांचा विश्वास, संपत्ती ८३% वाढली; ८१ लाख पोर्टफोलिओंची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 2:03 PM

मार्च २०२४ मध्ये फोलिओंची संख्या १.९ कोटीवर पोहोचली. 

गुंतवणूकदारांचा सहभाग वाढल्यामुळे मार्च २०२४ च्या अखेरीस स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांची संपत्ती वार्षिक आधारावर ८३% वाढून २.४३ लाख कोटी झाली. गुंतवणूकदार वाढल्याने संपत्तीतील वाढीला बळ मिळाले. मार्च २०२४ मध्ये फोलिओंची संख्या १.९ कोटीवर पोहोचली. आदल्या वर्षी ती १.०९ कोटी होती. यात ८१ लाखांची वाढ झाली आहे. 

लोक म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे अनेक बिगर-सूचिबद्ध स्मॉल-कॅप कंपन्या भांडवली बाजारातून समर्थन मागत आहेत, अशी प्रतिक्रिया ‘फायर्स’चे उपाध्यक्ष (संशोधन) गोपाल कवलिरेड्डी यांनी दिली. 

वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये स्मॉल-कॅप फंडात ४०,१८८ कोटींची गुंतवणूक झाली. आदल्या वर्षाच्या २२,१०३ कोटींच्या तुलनेत ती खूप अधिक आहे. मार्चमध्ये स्मॉलकॅप फंडांत २ वर्षांत प्रथमच ९४ कोटी रुपयांची शुद्ध विक्रीही पाहायला मिळाली आहे. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा