Join us

केवळ ₹२०... कधी विचारही केला नसेल हे किती कामी येतील, SIP चा २०-२०-२० चा फॉर्म्युला करू शकतो मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:44 IST

तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ २० रुपयांची छोटीशी बचतही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. आज आपण असाच २०-२०-२० चा फॉर्म्युला जाणून घेऊ, जो तुमचे संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतो.

तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ २० रुपयांची छोटीशी बचतही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. आज आपण असाच २०-२०-२० चा फॉर्म्युला जाणून घेऊ, जो तुमचे संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतो. होय, दररोज २० रुपयांची बचत करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता. यासाठी २०-२०-२० फॉर्म्युला तुम्हाला मदत करेल. हा फॉर्म्युला तुम्हाला तुमचे पैसे वाढवण्यास मदत करेलच, पण एक छोटीशी सवय लावून तुम्ही मालामाल करू शकते.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची (एसआयपी) क्रेझ लोकांमध्ये वाढतच आहे. एसआयपी खात्यांची संख्या नोव्हेंबर २०२४ मध्ये सुमारे १०.२२ कोटींवर पोहोचली, जी ऑक्टोबरमध्ये सुमारे १०.१२ कोटी होती. त्याचवेळी एसआयपीचे एकूण एयूएम (असेट्स अंडर मॅनेजमेंट) सुमारे १३.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं, जे या योजनेतील लहान गुंतवणूकदारांचा वाढता रस दर्शवतं.

छोटी गुंतवणूक, मोठा परतावा

योग्य नियोजन करून एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फंड तयार करता येऊ शकतो. एसआयपीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नियमित गुंतवणुकीची सुविधा. दिवसाला फक्त २० रुपयांची बचत करून तुम्ही कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. २०-२०-२० फॉर्म्युला कंपाउंड केल्यास २० रुपयांची छोटी बचत दीर्घ काळासाठी मोठा फंड तयार करू शकते.

एसआयपीमध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात उत्कृष्ट परतावा मिळू शकतो. जर तुम्ही एसआयपीमध्ये दररोज २० रुपये गुंतवले आणि गुंतवणूक दरवर्षी २०% नं वाढवली आणि १४% वार्षिक परतावा मिळत असेल, तर २० वर्षांत तुम्हाला सुमारे ₹३४ लाखांचा निधी मिळेल.

कसा मिळू शकतो ३४ लाखांचा फंड?

यामध्ये पहिल्या वर्षाची गुंतवणूक सुमारे ₹७,३०० असणार आहे. मग दरवर्षी त्यात २०% वाढ केली असं समजू. असं केल्यानं, २० वर्षातील एकूण गुंतवणूक ₹१३.४४ लाख होईल, तर, १४% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, ही रक्कम सुमारे ₹३३.९८ लाखांपर्यंत वाढू शकते, कारण २० वर्षांसाठी परतावा ₹२०,५४ लाख असेल. ₹१३.४४ लाख आणि ₹२०.५४ लाख जोडल्यास एकूण निधी ३३.९८ लाख होईल.

एसआयपी गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अगदी लहान गुंतवणूकदारही यात सहभागी होऊ शकतो. आपण सातत्य आणि संयमानं दररोज २० रुपयांसारखी छोटी बचत चालू ठेवू शकता. या युक्तीनं भविष्यात व्यवसाय, उच्च शिक्षण किंवा आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा निधी तयार होऊ शकतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक