जर आपण गॅस सिलिंडर वापरत असाल, तर आपल्यासाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आता आपण एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता. यासंदर्भात नवे नियम जारी करण्यात आले आहेत. तर जाणून घ्या, आपण एका वर्षांत किती सिलिंडर घेऊ शकता.
आता निश्चित करण्यात आली आहे सिलिंडर्सची संख्या -आता ग्राहकांसाठी घरगुती अथवा स्वयंपाकाच्या गॅसची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यानुसार आता कुठल्याही ग्राहकाला एका वर्षांत केवळ 15 सिलिंडर्ससाठीच बुकिंग करता येणार आहे. अर्थात आता आपल्याला एका वर्षात केवळ 15 सिलिंडरच मिळू शकणारन आहेत. तसेच, एका महिन्यात आपल्याला 2 हून अधिक सिलिंडर विकत घेता येणार नाहीत.
महिन्याचा कोटाही निश्चित - गॅस सिलिंडर विकत घेण्यासंदर्भात नवे नियम तयार करण्यात आले आहेत. तथापी, आतापर्यंत सिलिंडर मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारचा महिन्याचा अथवा वर्षाचा कोटा निश्चित करण्यात आलेला नव्हता. माध्यमांतील वृत्तांनुसार, एका वर्षात अनुदानित सिलिंडर्सची संख्या 12 झाली आहे. अर्थात आपण 15 सिलेंडर घेतले असले तरी, आपल्या केवळ 12 सिलिंडरवरच हे अनुदान अथवा सब्सिडी मिळेल.
ऑक्टोबर महिन्यात जारी झाले होते नवे दर - IOC नुसार, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती जारी करण्यात आल्या आहेत. यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, चेन्नईत 1068.5 रुपये आणि कोलकात्यात 1079 रुपये एवढी झाली आहे.