Join us  

Mutual Fundsकडून टॉप कंपन्यांवर पैशांचा पाऊस, ३ वर्षांत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:52 PM

Mutual Funds Investment : देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रातील २७ आघाडीच्या कंपन्यांमध्ये ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाहा कोणत्या आहेत टॉप १० कंपन्या.

Mutual Funds Investment : देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रातील २७ आघाडीच्या कंपन्यांमध्ये ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस सारख्या कंपन्यांमधील म्युच्युअल फंडांनी केलेल्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. मिंटने बीएसईच्या आकडेवारीच्या याचं विश्लेषण केलं आणि त्यात फायनान्शिअल, ऑटोमोबाइल, एनर्जी, आयटी आणि कन्झ्युमर गुड्स ही क्षेत्रं या म्युच्युअल फंडांसाठी विशेष आकर्षक ठरली असल्याचं समोर आलंय. यात त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे. 

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे प्रमुख अभिलाष पगारिया यांनी म्युच्युअल फंडातील पैशांच्या प्रवाहाबाबत आशा व्यक्त केली आणि शेअर बाजारात म्युच्युअल फंडांची गुंतवणूक वाढतच राहणार असल्याचं म्हटलं. सध्या एसआयपीमधून (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुमारे २.३ अब्ज डॉलर्स बाजाराला चालना देत आहेत. परंतु, इक्विटी गुंतवणुकीच्या बाबतीत भारत अजूनही कमी एन्ट्री असलेली बाजारपेठ आहे, असल्याचं त्यांनी सांगितलं. 

१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत भारतीय शेअर बाजारानं दमदार कामगिरी केली असून निफ्टी ५० आणि सेन्सेक्स निर्देशांक ४७ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. निफ्टी ऑटो निर्देशांकातही ११३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून निफ्टी बँक आणि आयटी निर्देशांकात अनुक्रमे ३९ टक्के आणि ३४ टक्के वाढ झाली आहे. 

'या' १० कंपन्यांवर पैशांचा जोरदार पाऊस 

  • एचडीएफसी बँक
  • रिलायन्स इंडस्ट्रीज
  • मारुती सुझुकी
  • कोटक महिंद्रा बँक
  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
  • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन
  • हिंदुस्थान युनिलिव्हर
  • इंटरग्लोब एव्हिएशन
  • बजाज फायनान्स
  • कोफोर्ज 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकरिलायन्सएचडीएफसी