Lokmat Money >म्युच्युअल फंड > Mutual Fund Profit : म्युच्युअल फंडातील नफा वाढवायचा?, जाणून घ्या यामागील फंडा!

Mutual Fund Profit : म्युच्युअल फंडातील नफा वाढवायचा?, जाणून घ्या यामागील फंडा!

पाहा कसं असतं म्युच्युअल फंडाचं काम आणि तुमचा नफा वाढवण्यासाठी काय करता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:58 AM2022-08-12T10:58:29+5:302022-08-12T10:58:35+5:30

पाहा कसं असतं म्युच्युअल फंडाचं काम आणि तुमचा नफा वाढवण्यासाठी काय करता येईल.

Mutual Fund Profit To increase the profit in mutual fund know tips and tricks behind this | Mutual Fund Profit : म्युच्युअल फंडातील नफा वाढवायचा?, जाणून घ्या यामागील फंडा!

Mutual Fund Profit : म्युच्युअल फंडातील नफा वाढवायचा?, जाणून घ्या यामागील फंडा!

गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून विविध फंड योजनांमध्ये गुंतवण्याचे काम करते ती कंपनी म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनी. यालाच फंड हाऊस असही म्हटलं जातं. यात कंपनीकडून म्हणजेच फंडाकडून वेगवेगळ्या योजना बाजारात आणल्या जातात. या योजनांना म्युच्युअल फंड स्कीम म्हणजेच फंड योजना असं म्हणतात.

‘अमुक अमुक लार्ज कॅप इक्विटी फंड’ असं एखाद्या फंड योजनेचे नाव असेल याचा अर्थ अमुक अमुक या फंड घराण्याकडून चालवली गेलेली लार्ज कॅप म्हणजेच मोठ्या आकाराच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारी ही योजना आहे असा त्याचा अर्थ लावायचा.

फंड मॅनेजर कोणाला म्हणतात?
फंड घराण्यांनी म्युच्युअल फंडाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर लोकांकडून जमा केलेले पैसे कुठे गुंतवायचे? याचा निर्णय घेण्यासाठी नेमलेला एक्सपर्ट म्हणजेच फंड मॅनेजर. एका फंड घराण्याकडे प्रत्येक स्कीम सांभाळण्यासाठी एक किंवा अनेक फंड मॅनेजर असू शकतात.  काहीवेळा एक स्कीम मॅनेज करण्यासाठी एकापेक्षा जास्त एक्स्पर्ट्स नेमले जाऊ शकतात.

फंड मॅनेजर म्हणजे काय?
शेअर बाजार, त्यात घडणाऱ्या घडामोडी यांचे सखोल ज्ञान असलेल्यांनाच फंड मॅनेजर म्हणून घेतलं जातं. पेशाने उच्चशिक्षित असलेले व व असेट मॅनेजमेंटचा अनुभव असलेले तज्ञ यासाठी निवडले जातात.  या फंड मॅनेजरना मदत करण्यासाठी एक टीम असते. या टीम मध्ये आपापल्या क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले एक्सपर्ट असतात. काही फंडांमध्ये परदेशातल्या सिक्युरिटी मध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते.  अशावेळी जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या बाजारांचा अभ्यास असलेले फंड मॅनेजर नेमले जातात.

गुंतवणूक सल्लागार
म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे आहेत ते कसे गुंतवावेत याचा सल्ला देण्याचे काम म्युच्युअल फंड सल्लागार करतात. अशा सल्लागारांकडे तसे कौशल्य असते.  एखाद्या व्यक्तीला म्युच्युअल फंड विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच फंड विकता येतात.  याचा अर्थ तुम्ही ज्या फंड वितरका मार्फत  गुंतवणूक करता त्याला म्युच्युअल फंडाची माहिती असते.  अशा अधिकृत विक्रेत्यांना ARN  क्रमांक मिळतो. फंडातील गुंतवणूक पारदर्शक असावी यासाठी असे नियम करण्यात आले आहेत.

Web Title: Mutual Fund Profit To increase the profit in mutual fund know tips and tricks behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.