Lokmat Money >म्युच्युअल फंड > मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो?

मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो?

MF SIP : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी बंपर परतावा दिला आहे. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल या गोष्टी जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:06 IST2025-01-20T13:06:05+5:302025-01-20T13:06:38+5:30

MF SIP : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी बंपर परतावा दिला आहे. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल या गोष्टी जाणून घ्या.

mutual-fund-return-multicap-elss-and-bluechip-schemes-are-giving-better-returns-know-trend | मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो?

मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो?

SIP : शेअर बाजारातील चढउतारातही म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ने शेअर मार्केटमध्ये नियमितपणे गुंतवणूक करणे सोपे केले आहे. ज्यामुळे बाजाराच्या एकूण वाढीला देखील हातभार लागला आहे. उदाहरणार्थ, २०१० ते २०२४ पर्यंत निफ्टी ५० चा अंदाजे चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) अंदाजे ११.८५ टक्के आहे. या वाढीला मजबूत कॉर्पोरेट कमाई, अनुकूल सरकारी धोरणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे पाठिंबा मिळाला आहे. तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या योजनेत सर्वाधिक फायदा मिळेल, हे माहिती असणे आवश्यक आहे.

गेल्या काही दशकांमध्ये, भारत कृषी अर्थव्यवस्थेपासून सेवा आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक शक्ती बनला आहे. हा बदल तरुण लोकसंख्या, जलद शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण विकासामुळे झाले आहे. आर्थिक विकासाचा शेअर बाजारावर खोलवर परिणाम होतो. निफ्टी ५० सारखे निर्देशांक सतत नवीन उच्चांक गाठत आहेत. यातून देशाची क्षमता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो.

डेटानुसार मल्टीकॅप फंडांनी गुंतवणूकदारांना संतुलित जोखीम-परतावा प्रोफाइल दिलं आहे. अ‍ॅक्सिस मल्टीकॅप फंडाने ३ वर्षांत २०.४० टक्के CAGR परतावा दिला आहे. त्याने सातत्याने आपल्या बेंचमार्कला मागे टाकले आहे. बिर्ला मल्टीकॅपने या कालावधीत १२.६४ टक्के आणि एचडीएफसीने १९.९३ टक्के परतावा दिला आहे. अ‍ॅक्सिस ब्लूचिप फंडाने त्याच्या बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली आहे. सलग १५ वर्षे १२.४८% CAGR परतावा दिला आहे. हा फंड उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करतो, जे गुंतवणूकदारांना स्थिरता आणि वाढीची क्षमता देतात.
 
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) फंड हा कर वाचवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ही योजना संभाव्य भांडवली वाढ आणि कर बचत यांचा दुहेरी लाभ देते. अ‍ॅक्सिस फंडच्या ३ वर्षांच्या लॉक-इन योजनेने १५ वर्षात दरवर्षी १६.०३ टक्के CAGR दराने परतावा दिला आहे. एका वर्षात एसबीआयने १५.७७ टक्के परतावा दिला आहे. एसबीआयने एका वर्षात १३.९३ टक्के परतावा दिला आहे. एचडीएफसीने १३.३३ टक्के परतावा दिला आहे. तर डीएसपीने एका वर्षात १५.२ टक्के परतावा दिला आहे. अ‍ॅक्सिसच्या रिटायरमेंट फंडानेही ५ वर्षांत दुहेरी आकडी परतावा दिला आहे.
 
अ‍ॅक्सिस ईएसजी इंटिग्रेशन स्ट्रॅटेजी फंड, ५ वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे. मजबूत ESG पद्धती असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो. स्थापनेपासून या फंडाने १६.६६ टक्के CAGR वर परतावा दिला आहे. कमी जोखीम आणि अल्प गुंतवणूक कालावधीत स्थिर परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शॉर्ट टर्म फंड हा एक आदर्श पर्याय असू शकतो. हे फंड मुख्यतः डेट आणि करन्सी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतात ज्यात परिपक्वता कालावधी एक ते तीन वर्षांचा असतो. अ‍ॅक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंडाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या स्थापनेपासून ७.५१ टक्के CAGR परतावा दिला आहे.

Web Title: mutual-fund-return-multicap-elss-and-bluechip-schemes-are-giving-better-returns-know-trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.