Join us

ईएलएसएस फंड म्हणजे काय? गुंतवणूक करा, उत्तम रिटर्न्स मिळवा अन् टॅक्सही वाचवा!

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 29, 2023 1:08 PM

Mutual Funds : म्युच्युअल फंड्समध्ये ईएलएसएस फंड हा एक प्रकार आहे ज्यात केलेली गुंतवणूक आयकर वाजवटीस पात्र राहते.

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

आयकर वाचविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात जसे पीपीएफ, पोस्टातील विविध अल्पबचत योजनेतील गुंतवणूक, टॅक्स सेव्हिंग बॉण्ड इत्यादी. परंतु म्युच्युअल फंड्समध्ये ईएलएसएस फंड हा एक प्रकार आहे ज्यात केलेली गुंतवणूक आयकर वाजवटीस पात्र राहते. ईएलएसएस म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. 

आयकर नियमानुसार यातील गुंतवणूक कलम ८० सी अंतर्गत आयकर वाजवटीस पात्र असते. जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक वाजवटीस पात्र राहते. ईएलएसएस फंडमधील गुंतवणुकीचा लॉक इन कालावधी तीन वर्षांचा असतो. याचाच अर्थ गुंतवणूक तीन वर्षे काढता येत नाही.

ईएलएसएस म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्समागील १ वर्ष  - ९ ते २५ टक्केमागील ३ वर्षं -  १० ते २७ टक्केमागील ५  वर्षं - ९ ते २५ टक्केमागील १० वर्षे - १४ ते २३ टक्के(परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात.)

केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे जारी सूचनेनुसार ईएलएसएस स्कीममधील रक्कम फंड संस्थेतर्फे गुंतविली जाते. हेही वाचाः भाग १Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडाहेही वाचाः भाग २ म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्याहेही वाचाः भाग ३ म्युच्युअल फंडचा राजा 'इक्विटी फंड'; यात कसे मिळतात जास्तीत जास्त 'रिटर्न्स'?व्हॅल्यू फंड म्हणजे नेमके काय? शेअर बाजारात असे बऱ्याच वेळा पाहायला मिळते की कंपनी उत्तम आहे परंतु तिच्या शेअर शेअरच्या किमतीत अपेक्षित वाढ होत नाही. याचाच अर्थ असा की त्या शेअरला अपेक्षित व्हॅल्यू नाही. म्युच्युअल फंड ऑपरेटर संस्था असे शेअर हेरून काढतात, ज्याची प्रत्यक्षात व्हॅल्यू जास्त आहे परंतु सध्या बाजारात कमी किमतीत उपलब्ध आहे. भविष्यात अशा शेअर त्यांच्या अपेक्षित व्हॅल्यूला खरे उतरतील किंवा तसे होण्याची क्षमता राखतात. कमी भावात खरेदी करून कालांतराने योग्य आणि वाढीव भाव आल्यावर विक्री केली जाते. यातील रिस्क फॅक्टर तेव्हा जास्त होतो जेव्हा निवडलेल्या शेअर्सची अपेक्षित व्हॅल्यू भविष्यात येत नाही किंवा भविष्यात शेअरच्या किंमतीत अपेक्षित वाढ होत नाही.  पण या उलटही होऊ शकते. निवड योग्य असेल तर भविष्यात उत्तम परतावा मिळू शकतो. एकूणच रिस्क फॅक्टर लक्षात घेता म्युच्युअल फंडात गुंतवायची पूर्ण रक्कम फक्त व्हॅल्यू फंडमध्ये न गुंतवता इतरही फंड्समध्ये विभागली पाहिजे. हेही वाचाः भाग ४आधे इधर, आधे उधर... बड्या कंपन्यांचे शेअर पडले, तरी गुंतवणूक 'सेफ' ठेवणारा फंडा!हेही वाचाः भाग ५Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

व्हॅल्यू म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्समागील १ वर्ष  - १३ ते ३० टक्केमागील ३ वर्षं -  १६ ते ३१ टक्केमागील ५  वर्षं -  ११ ते २० टक्केमागील १० वर्षे -  १२ ते २० टक्के

स्रोत : ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन संकेतस्थळ

गुंतवणूकदारांनी कृपया नोंद घ्यावी की म्युचअल फंडमधील परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात.कोरोनानंतर शेअर बाजार एकतर्फा वाढला यामुळे तीन वर्षांतील रिटर्न्स सर्वोत्तम दिसत आहेत. विविध कॅपमधील फंड्समध्येही असे आवर्जून निदर्शनास येते.

पुढील भागात कॉन्ट्रा फंड आणि डिव्हीडंड यिल्ड फंड विषयी...

टॅग्स :गुंतवणूक