Mutual Fund SIP Hits All-Time High : तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. पण, जोखीम उचलण्याची हिंमत होत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे फंडातील गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये म्युच्युअल फंडातील SIP ने पहिल्यांदाच २६,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात १५ टक्क्यांनी वाढून ४१,१५५ कोटी रुपये झाली आहे.
एसआयपी गुंतवणूक २६००० कोटींच्या पुढे
डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. असे असूनही, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर अजूनही विश्वास आहे. ते दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. याचा परिणाम असा की असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड (AMFI) ने डिसेंबर २०२४ साठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात, SIP द्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २६००० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे.
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये बंपर गुंतवणूक
AMFI ने डिसेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार, मिड-कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये सर्वाधिक ५०९३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, जी नोव्हेंबरमध्ये ४८८३ कोटी रुपये होती. लार्ज कॅपमधील गुंतवणूक 2010 कोटींवर आली आहे जी नोव्हेंबरमध्ये 2547 कोटी रुपये होती. स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये 4667 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे जी नोव्हेंबरमध्ये 4111 कोटी रुपये होती. लार्ज कॅपमधील गुंतवणूक २०१० कोटींवर आली आहे, जी नोव्हेंबरमध्ये २५४७ कोटी रुपये होती. स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये ४६६७ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, जी नोव्हेंबरमध्ये ४१११ कोटी रुपये होती.
२०२४ मध्ये भांडवल २७ टक्क्यांनी वाढलं
AMFI डेटानुसार, डिसेंबरमध्ये एकूण निव्वळ आवक ८०,५०९ कोटी रुपये होती तर गुंतवणूकदारांनी डेट फंडातून १.२७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) २ टक्क्यांनी घसरून ६६.६६ लाख कोटी रुपये झाली आहे, जी नोव्हेंबरमध्ये ६७.८१ लाख कोटी रुपये होती. व्यवस्थापनाखालील मालमत्ता जानेवारी २०२४ मध्ये ५२.४४ लाख कोटी रुपये होती, जी वर्षाच्या अखेरीस २७ टक्क्यांनी वाढून ६६.६६ कोटी रुपये झाली. डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांनी ३४ एनएफओ जारी केले ज्यातून १३८५२ कोटी रुपये जमा झाले.
डिस्क्लेमर : यात म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. कुठल्याही प्रकारे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.