भारतात उत्पादन क्षेत्रात नवनवे बदल दिसून येत आहे. उत्पादन वृद्धीतील क्षमतांचा लाभ गुंतवणूकदारांना घेता यावा यासाठी अॅक्सिस म्युच्युअल फंडानं अॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरू करणार असल्याची घोषणा केली. अॅक्सिस म्युच्युअल फंडची ही स्कीम ओपन-एन्डेड इक्विटी स्कीम आहे.
हा एनएफओ १ डिसेंबर पासून १५ डिसेंबर २०२३ पर्यंत खुला राहील. यामध्ये किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करावी लागणार आहे. श्रेयस देवलकर आणि नितीन अरोरा याचे फंड मॅनेजर्स आहेत. इन्व्हेस्टमेंट, कन्झम्प्शन आणि नेट एक्सपोर्ट या तीन विभागांमधील कंपन्यांवर हा फंड लक्ष केंद्रित करणार आहे.
"मेक इन इंडियासारखे धोरणात्मक उपक्रम आणि अनेक वेगवेगळ्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सध्याच्या या महत्त्वपूर्ण काळात अॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करण्यात येत आहे. हा थेमॅटिक फंड, भारताच्या वाढत्या गतीचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा फंड भारताच्या उत्पादन महत्त्वाकांक्षेच्या सोबतीनं विकसित होण्यासाठी तयार केला आहे," अशी प्रतिक्रिया अॅक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी गोप कुमार यांनी दिली.
"सरकारकडून मिळत असलेलं प्रोत्साहन, अनुकूल धोरण संरचना आणि याच क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसाठी वाढलेली स्पर्धात्मकता यामुळे भारतात वेगानं बदल घडून येत आहे. अॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करून आम्ही एक असा पोर्टफोलिओ तयार करू इच्छितो ज्यामध्ये आमच्या गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या संधीत योगदान दिलं जाईल," अॅक्सिस एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आशिष गुप्ता यांनी सांगितलं.
(टीप - यात एनएफओची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )
MF ची नवी स्कीम, १ डिसेंबरपासून संधी; ५०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक
१ डिसेंबरपासून खुला होणार एनएफओ.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:55 PM2023-11-29T16:55:15+5:302023-11-29T16:58:01+5:30