Lokmat Money >म्युच्युअल फंड > म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ

म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ

Mututal Fund : कोणत्याही एनएफओमध्ये विचार न करता पैसे गुंतवणे योग्य नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:11 AM2024-10-23T10:11:34+5:302024-10-23T10:12:29+5:30

Mututal Fund : कोणत्याही एनएफओमध्ये विचार न करता पैसे गुंतवणे योग्य नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

nfo before investing in a new mutual fund scheme check these 4 criteria otherwise you will incur loss instead of profit | म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ

म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ

Mututal Fund : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. शेअर बाजारातील घसरणीनंतर म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. म्युच्युअल फंड हाउसेस नवीन फंड ऑफर्स (NFO) घेऊन येत आहेत. नवीन म्युच्युअल फंड योजनेत स्वस्त युनिट वाटपाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना मोठ्या कमाईचे स्वप्न दाखवले जात आहे. NFO मध्ये, म्युच्युअल फंड कंपन्या प्रथमच गुंतवणूकदारांना नवीन म्युच्युअल फंड योजनेचे युनिट विकतात. NFO साठी एक कालमर्यादा असतो. म्हणजे ठराविक मुदतीतच त्यात गुंतवणूक करता येते. NFO हे अगदी IPO सारखे आहे. कमी पैशात अधिक युनिट्स खरेदी करण्याची संधी असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. पण विचार न करता कोणत्याही एनएफओमध्ये पैसे गुंतवणे योग्य नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. 

फंडाचे मूल्य
कोणत्याही एनएफओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाचे मूल्यांकन जाणून घेणे आवश्यक आहे. यानंतर, तुमचे पैसे कुठे गुंतवले जातील हे पाहण्यासाठी त्या फंडाची रचना पहा. जर हाय बीटा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही अधिक जोखीम घेण्यास तयार आहात का? तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार फंड निवडणे चांगले.

फंडाची थीम काय आहे?
प्रत्येक गुंतवणूकदाराला NFO ची थीम माहितीच असायला हवी . तुमचा पैसा कोणत्या क्षेत्रात गुंतवला जाईल? ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिन्युएबल एनर्जीमध्ये चांगला परतावा अपेक्षित आहे. जर फंडाचा पैसा या क्षेत्रांमध्ये गुंतवला जात असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता.

नवीन इंडेक्स फंड उत्तम पर्याय 
गुंतवणूकदारांनी नवीन इंडेक्स तयार करणाऱ्या एनएफओमध्ये गुंतवणूक करावी. बाजारातील विशिष्ट विभागांना कॅप्चर करणारे फंड आकर्षक गुंतवणूक असू शकतात. कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करणे किंवा आर्बिट्राज ट्रेडमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे.

खर्चाचे प्रमाण नक्की पहा 
कोणत्याही नवीन फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे खर्चाचे प्रमाण निश्चितपणे तपासा. कमी खर्चाचे प्रमाण असलेला फंड फायदेशीर आहे. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो.

Web Title: nfo before investing in a new mutual fund scheme check these 4 criteria otherwise you will incur loss instead of profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.