Join us

FD-स्टॉक सोडा, 'या' म्युच्युअल फंडांनी दर ४ वर्षांत केलेत पैसे डबल; गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 4:23 PM

जर तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो.

जर तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला पर्याय असू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला आहे. असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यामध्ये दर चार वर्षांनी गुंतवणूकदारांचापैसा दुप्पट झालाय. या म्युच्युअल फंडांनी एफडी आणि स्टॉकच्या तुलनेत बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळालाय. यापैकी काही फंड जुनेही आहेत.

यांनी दिले बंपर रिटर्नजर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर इक्विटी थीमॅटिक ईएसजी कॅटेगरीतील एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील. ही स्कीम 1991 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही स्कीम एक हजार रुपये मासिक एसआयपी असलेली स्कीम असून लाँच झाल्यापासून, गुंतवणूकदारांना 14.74 टक्के वार्षिक परतावा मिळालाय.

टाटा लार्ज मिडकॅप फंडटाटा लार्ज आणि मिडकॅप फंडाची स्कीम लार्ज आणि मिडकॅप कॅटेगरीमध्ये 1993 मध्ये सुरू करण्यात आली. ही स्कीम सुरू झाल्यापासून, गुंतवणूकदारांना दरवर्षी 13 टक्के इतका चांगला परतावा मिळत आहे. जर तुम्हाला या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. हीदेखील एसआयपीवाली स्कीम आहे.

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडफ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाची स्कीम लार्जकॅप कॅटेगरीत 1993 मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये गुंतवणूकदारांना दरवर्षी 19 टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे. या स्कीमला सुरुवात झाल्यापासून गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ही स्कीम 500 रुपये मासिक SPI असलेली स्कीम आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 5 हजार रुपये आहे.

SBI लाँग टर्म इक्विटी फंडईएलएसएस कॅटेगरीतील SBI लाँग टर्म इक्विटी फंडाच्या स्कीमनं लाँच झाल्यापासून गुंतवणूकदारांना दरवर्षी 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. ही स्कीम 1993 मध्ये लाँच करण्यात आली होती. ही स्कीम 500 रुपये मासिक SPI असलेली योजना आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 500 रुपये आहे.

SBI लार्ज अँड मिडकॅप फंडSBI लार्ज अँड मिडकॅप फंड 1993 मध्ये लार्ज आणि मिडकॅप कॅटेगरीत सुरू करण्यात आला. ही स्कीम सुरू झाल्यापासून, ती गुंतवणूकदारांना दरवर्षी 14 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देत आहे. ही स्कीम 500 रुपये मासिक SPI असलेली स्कीम आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 5 हजार रुपये आहे.

(टीप- यामध्ये म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारपैसा