Lokmat Money >म्युच्युअल फंड > क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंडानं ५ वर्षांत १ लाखाचे केले ३ लाख, ३८ MF नं गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट; तुम्ही घेतला फायदा?

क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंडानं ५ वर्षांत १ लाखाचे केले ३ लाख, ३८ MF नं गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट; तुम्ही घेतला फायदा?

पाहा कोणते आहेत हे फंड्स ज्यांनी गुंतवणूकदारांना केलंय मालामाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 02:36 PM2023-06-30T14:36:14+5:302023-06-30T14:37:05+5:30

पाहा कोणते आहेत हे फंड्स ज्यांनी गुंतवणूकदारांना केलंय मालामाल.

Quant Active Fund made 1 lakh to 3 lakh in 5 years 38 mutual funds doubled investors money know funds name | क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंडानं ५ वर्षांत १ लाखाचे केले ३ लाख, ३८ MF नं गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट; तुम्ही घेतला फायदा?

क्वांट अ‍ॅक्टिव्ह फंडानं ५ वर्षांत १ लाखाचे केले ३ लाख, ३८ MF नं गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट; तुम्ही घेतला फायदा?

सध्या बँकांमधील मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरानुसार, गुंतवणूकदारांचं भांडवल पुढील १२ वर्षांत दुप्पट होऊ शकते. तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचं भांडवल मात्र गेल्या ५ वर्षांत दुप्पट झालंय. जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुमचा पैसा वाढवायचा असेल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की म्युच्युअल फंडात भांडवल वाढवण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना इक्विटी फंड योजनांद्वारे कमी कालावधीत त्यांचे भांडवल वाढविण्यात खूप मदत मिळू शकते. जर तुमच्यासाठी ५ वर्षांचा कालावधी कमी असेल, तर या कालावधीत देशातील किमान ३८ म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. केवळ ५ वर्षात गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट करणाऱ्या योजनांमध्ये स्मॉल कॅप, ईएलएसएस, लार्ज आणि मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, फोकस्ड फंड, मिड कॅप, कॉन्ट्रा फंड, व्हॅल्यू फंड आणि मल्टी फंड कॅटेगरीच्या योजनाही आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या ५ वर्षांत लार्ज कॅप योजना गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट करण्यात यशस्वी ठरलेल्या नाहीत. गेल्या ५ वर्षांत, १२ मिड कॅप फंडांनी गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट केलंय. १० स्मॉल कॅप फंड, ४ फ्लेक्सी कॅप फंड, ३ मल्टीकॅप फंड, ३ एलएसीएस आणि ३ लार्ज आणि मिड कॅप फंडांनी गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट केलेय.

स्मॉलकॅपची उत्तम कामगिरी
जर आपण स्मॉल कॅप फंडांबद्दल बोललो तर, क्वांट अॅक्टिव्ह फंड या श्रेणीमध्ये अव्वल आहे, ज्यानं २५.६८ टक्के वार्षिक परतावा दिलाय आणि गुंतवणूकदारांचं भांडवल तिप्पट केलंय. जर एखाद्या गुंतवणूकदारानं जून २०१८ मध्ये क्वांट अॅक्टिव्ह फंडमध्ये ₹१,००,०० ची गुंतवणूक केली असेल, तर या वेळी त्याचं मूल्य ₹३.१३ लाख झालं असतं.

गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत, क्वांट टॅक्स प्लॅननं २२.४६ टक्के परतावा दिला आहे तर अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप फंडानं २१.१ टक्के परतावा दिलाय. क्वांट टॅक्स प्लॅन फंडानं २०.९१ टक्के परतावा दिलाय. तर क्वांट फ्लेक्सी कॅप फंडानं पाच वर्षात गुंतवणूकदारांना १९.८५ टक्के परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Quant Active Fund made 1 lakh to 3 lakh in 5 years 38 mutual funds doubled investors money know funds name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.