Lokmat Money >म्युच्युअल फंड > ₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड!

₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड!

Mutual Fund SIP Return : 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 08:46 PM2023-01-13T20:46:42+5:302023-01-13T20:47:37+5:30

Mutual Fund SIP Return : 

RS 20000 sip becomes 1 4 crore rupees in nippon india small cap fund | ₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड!

₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड!

एसअँडपी बीएसई सेन्सेक्स 2022 अखेरच्या महिन्यात जवळपास 4 टकक्यांनी घसरत रेड लाईनवर थांबला. याशिवाय, संपूर्ण 2022 मध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 2.78 लाख कोटी रुपयांचे शेअर विकले. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी वर्षाच्या अखेरीस FII चा विक्रीचा दबाव कमी करण्यास बाजाराची मदत केली. 

या दरम्यान, स्मॉल-कॅपने गेल्या एका वर्षात बरेच नुकसान केले आहे. मात्र, स्मॉल-कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला आहे. यांनी केवळ आपल्या बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरीच केली नाही, तर सिंगल-डिजिट रिटर्न देखील दिला. यांपैकीच एक आहे, निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप फंड.  (Nippon india small cap fund)

सप्टेंबर 2010 मध्ये करण्यात आला होता लॉन्च - 
निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप फंड ही निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाची एक ऑफर आहे. हिला सप्टेंबर 2010 मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या फंडाने सुरुवातीपासूनच 19.8% परतावा दिला आहे. तसेच, या फंडात दरमहा 20,000 रुपयांच्या SIP चे रुपांतर आता 1.4 कोटी रुपयांत झाले आहे. याचा वार्षिक परतावा सुमारे 23.41 टक्के एवढा आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप फंडाचे गुंतवणूक धोरण प्रामुख्याने स्मॉल-कॅप स्पेसवर फोकस करणाऱ्या शेअर्सच्या विविध पोर्टफोलिओंवर आधारलेली आहे. महत्वाचे म्हणज, स्मॉल-कॅप फंडात गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असते.

(टीप - येथे केवळ म्युच्युअल फंडाच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: RS 20000 sip becomes 1 4 crore rupees in nippon india small cap fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.