SBI Jannivesh Scheme: आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या कमाईचा काही भाग निवृत्तीसाठी वाचवतो, जेणेकरून वयाच्या त्या टप्प्यावर त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागू नये किंवा जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागू नये. तुमची छोटी बटसुद्धा तुमची समस्या सोडवू शकते आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एक नवीन एसआयपी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये केवळ २५० रुपयांपासून सुरुवात केली जाऊ शकते आणि दरमहा नियमितपणे बचत करून १७ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया याचं पूर्ण कॅलक्युलेशन.
सर्वप्रथम एसबीआय म्युच्युअल फंड (SBI Mutual Fund) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी सुरू केलेल्या जन प्रवेश एसआयपी योजनेबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही योजना विशेषत: ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात राहणाऱ्या पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि लहान बचतदारांना म्युच्युअल फंड योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदार केवळ २५० रुपयांपासून सुरुवात करून दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात.
गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय
योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आणि उत्तम परतावा देऊन छोट्या बचतीतून तुम्ही मोठा फंड उभा करू शकता आणि या अर्थाने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी खूप लोकप्रिय होत आहे. एसबीआयच्या या एसआयपी योजनेत गुंतवणूकदार सुरुवातीला एसबीआय बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडात गुंतवणूक करू शकतात, हा एक फंड आहे जो फंड मॅनेजर्सद्वारे इक्विटी आणि डेट दरम्यान गुंतवणूक चे धोरणात्मक वाटप करतो.
१७ लाखांपेक्षा जास्त रक्कम कशी जमेल
तुम्ही या योजनेंतर्गत दरमहा २५० रुपयांची गुंतवणूक करून १७ लाख रुपयांपेक्षा अधिकचा फंड बनवू शकता. एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय असून त्याचा इतिहास पाहिला तर गुंतवणूकदारांना १२ ते १६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. आता जर तुम्ही ३० वर्षांसाठी २५० रुपयांची मासिक एसआयपी चालवत असाल आणि या कालावधीत १५% परतावा मिळाला तर गुंतवणूकदाराकडे १७.३० लाख रुपये जमा होतील. यामध्ये ९०,००० रुपये जमा रक्कम आणि १६,६२,४५५ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे.
आता जर गुंतवणूकदारानं या छोट्या एसआयपी योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी ४० वर्षांपर्यंत वाढवला तर त्याच्याकडे ७८ लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. वास्तविक, एखाद्या गुंतवणूकदारानं ४० वर्षांसाठी दरमहा २५० रुपयांची नियमित गुंतवणूक केली आणि परतावा केवळ १५ टक्के असेल तर त्याची जमा रक्कम १.२० लाख रुपये होईल, परंतु त्याला मिळणारा परतावा कंपाउंडिंगसह ७७,३०,९३९ रुपये होईल आणि एकूण फंड ७८,५०,९३९ रुपये होईल. हे लक्षात ठेवा की या आकडेवारीत महागाई दराचा समावेश नाही, ज्यामुळे संभाव्यत: एकूण रकमेचं मूल्य कमी होऊ शकतं.
(टीप : यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)