mutual funds : जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याच्याशी संबंधित एक नियम माहिती असणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडांसाठी इनसाइडर ट्रेडिंगचे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचे बाजार नियामक सेबीने सांगितले आहे. या अंतर्गत, मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये नॉमिनी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेले १५ लाखांपेक्षा जास्तीचे सर्व व्यवहार २ व्यावसायिक दिवसांच्या आत अनुपालन अधिकाऱ्याला कळवावे लागतील. सूट मिळालेल्या योजना वगळता सर्व योजनांमध्ये १५ लाख रुपयांची मर्यादा एका व्यवहारात किंवा एका तिमाहीत अनेक व्यवहारांमध्ये मिळू शकते.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, नवीन नियम १ नोव्हेंबरपासून लागू होईल. नियामकाने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यांच्या नॉमिनी, विश्वस्त आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीची माहिती १ नोव्हेंबर २०२४ पासून तिमाही आधारावर देण्यास सांगितले आहे.
नवीन नियम आणण्याचे कारण काय?
सेबीने सांगितले की, कर्मचाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत समान सिक्युरिटीमध्ये ट्रेडिंग करण्यापासून नफा मिळवणे टाळावे आणि जर त्यांनी व्यवहार केला तर त्यांना त्याचे कारण अनुपालन अधिकाऱ्याला सांगावे लागेल. अनुपालन अधिकारी या संदर्भात मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या संचालक मंडळाला आणि विश्वस्तांना कळवतील. सेबीने नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिसूचनेद्वारे म्युच्युअल फंड युनिट्समध्ये इनसाइडर ट्रेडिंग नियमांनुसार व्यापार समाविष्ट केला. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता वाढवणे हा त्याचा उद्देश होता.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्यूच्युअल फंड एक असा फंड आहे, जो AMC म्हणजेच एसेट मॅनेजमेंट कंपनीज ऑपरेट करते. या कंपन्यांमध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवलेले असतात. म्यूच्युअल फंडद्वारे हे पैसे बॉन्ड, शेअर मार्केटसह अनेक ठिकाणी गुंतवले जातात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्यूच्युअल फंड अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो. यामध्ये एक फंड मॅनेजर असतो. तो फंड सुरक्षित पद्धतीने वेगवेगळा करुन विविध ठिकाणी गुंतवला जातो. म्यूच्युअल फंडने तुम्ही फक्त शेअर मार्केटच नाही तर गोल्डमध्येही गुंतवणूक करु शकता.