Lokmat Money >म्युच्युअल फंड > SIP Calculator : रिटायरमेंटनंतर १० कोटी हवेत? पाहा महिन्याला कितीची SIP करावी लागेल

SIP Calculator : रिटायरमेंटनंतर १० कोटी हवेत? पाहा महिन्याला कितीची SIP करावी लागेल

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा कालावधी जितका जास्त असेल तितका तुमचा परतावा जास्त असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:34 PM2023-06-27T12:34:43+5:302023-06-27T12:35:14+5:30

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा कालावधी जितका जास्त असेल तितका तुमचा परतावा जास्त असेल.

SIP Calculator Want 10 crores after retirement See how much SIP you have to do per month investment money | SIP Calculator : रिटायरमेंटनंतर १० कोटी हवेत? पाहा महिन्याला कितीची SIP करावी लागेल

SIP Calculator : रिटायरमेंटनंतर १० कोटी हवेत? पाहा महिन्याला कितीची SIP करावी लागेल

तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल, तर एसआयपी (SIP) हा सर्वात चांगला पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा कालावधी जितका जास्त असेल तितका तुमचा परतावा जास्त असेल. दीर्घ मुदतीत इक्विटीनं नेहमीच सकारात्मक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगचा लाभ मिळतो. जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर महागाईदेखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इक्विटी कॅटेगरीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, निफ्टीनं गेल्या २२ वर्षांत केवळ ४ वेळा नकारात्मक परतावा दिलाय.

१० कोटींचा फंड कसा तयार होईल?
जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर १० कोटी रुपयांचा निधी हवा असेल तर महिन्याला कितीची एसआयपी असायला हवी हे एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं जाणून घेऊ. यात हेदेखील समजून घेऊ की लाँग टर्ममध्ये एसआयपी वर कम्पाऊंडिंगचा किती लाभ मिळतो आणि गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळतात.

१५ हजारांनी बनतील १० कोटी
समजा गुंतवणूकदार 'ए' चं वय २५ वर्ष आहे आणि रिटायरमेंटवर त्याला १० कोटींचा फंड मिळवायचा असेल तर त्याला महिन्याला १५ हजार रुपयांची एसआयपी करायला हवी. गुंतवणूकीचा कालावधी ३५ वर्ष असेल आणि सरासरी रिटर्न १२ टक्के असेल असं मानू. या प्रकारे एकूण तुम्हाला ६३ लाख जमा करावे लागतील. त्यावर १० कोटींचे रिटर्न मिळतील. हे जवळपास १६ पट रिटर्न असतील.

३० व्या वर्षी २८ हजारांची एसआयपी
जर 'ए' चं वय ३० वर्ष असेल आणि रिटायरमेंटवर त्याला १० कोटींचा निधी जमा करायचा असेल तर त्या व्यक्तीला महिन्याला २८ हजारांची एसआयपी करायला हवी. वार्षिक १२ टक्क्यांचे रिटर्न मानू. या प्रकारे तुमची गुंतवणूक १ कोटी ८० लाख असेल. त्याचे तुम्हाला १० टक्के रिटर्न मिळतील.

४० व्या वर्षी लाखाची एसआयपी  
जर 'ए' चं वय ४० वर्ष असेल तर महिन्याला त्याला १ लाख रूपयांची एसआयपी करायला हली. २० वर्षांनंतर रिटारमेंटवर त्याला १० कोटींचा फंड तयार करता येईल. यामध्येही सरासरी १२ टक्क्यांचा रिटर्न मानू. गुंतवणूकीची एकूण रक्कम २.४ कोटी असेल. अशात त्याचे रिटर्न केवळ ४ पट असतील. यावरून एसआयपी जितक्या लवकर सुरू कराल तितका त्याचा फायदा जास्त आहे हे दिसून येतंय.

Web Title: SIP Calculator Want 10 crores after retirement See how much SIP you have to do per month investment money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.