Join us  

SIP मध्ये दरमहा २, ३ किंवा ५ हजार रुपये गुंतवले तर किती वर्षात १ कोटींचा फंड होईल? गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 2:13 PM

SIP Mutual Fund : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन कोट्यधीश होणे अवघड नाही. मात्र, यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल.

SIP Mutual Fund : शेअर बाजारात प्रचंड पैसा असला तरी जोखीमही तितकीच आहे. इथं रावाचे रंक होण्याला वेळ लागत नाही. ही जोखीम कमी करुन चांगला परतावा मिळवण्याचा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. यातही लहान गुंतवणूकदारांमध्ये एसआयपी अधिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्ही हमखास कोट्यधीश होऊ शकता. जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा २०००, ३००० किंवा ५००० रुपये गुंतवले तर किती वर्षात तुमच्याकडे १ कोटी रुपये जमा होतील? याचं गणित समजून घेऊ.

दरमहा २ हजार रुपयांची एसआयपी परताव्याचा दर : सरासरी १५%२८ वर्षात एकूण गुंतवणूक: ६ लाख ७२ हजार ००० रुपयेपरतावा : ९६ लाख ९१ हजार ५७३ रुपयेअंदाजे एकूण रक्कम : १ कोटी ३ लाख ६३ हजार ५७३ रुपयेअशा प्रकारे, जर तुम्ही दरमहा २,००० रुपये गुंतवले तर १ कोटींपेक्षा जास्त जमा होण्यासाठी २८ वर्षे लागतील.

दरमहा ३ हजार रुपयांची एसआयपी परताव्याचा दर : सरासरी १५ %२६ वर्षात एकूण गुंतवणूक : ९ लाख ३६ हजार रुपयेपरतावा : १ कोटी ५ लाख ३९ हजार ७४ रुपयेअंदाजे एकूण रक्कम : १ कोटी १४ लाख ७५ हजार ७४ रुपयेअशाप्रकारे, तुम्ही दरमहा ३,००० रुपये गुंतवल्यास, १ कोटींपेक्षा जास्त जमा होण्यासाठी २६ वर्षे लागतील.

दरमहा ५ हजार रुपयांची एसआयपीपरताव्याचा दर : सरासरी १५%२२ वर्षात एकूण गुंतवणूक : १३ लाख २० हजार रुपयेपरतावा : ९० लाख ३३ हजार २९५ रुपयेअंदाजे एकूण रक्कम : १ कोटी ३ लाख ५३ हजार २९५अशा प्रकारे, तुम्ही दरमहा ५,००० रुपये गुंतवल्यास, १ कोटींपेक्षा जास्त जमा होण्यासाठी २२ वर्षे लागतील.

(Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार