Lokmat Money >म्युच्युअल फंड > Tata Mutual Fund: टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

Tata Mutual Fund: टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

सध्या गृहनिर्माण क्षेत्रात किमती कमी आहेत, गृहकर्जाचे दरही कमी आहेत, अधिकाधिक शहरीकरण होत आहे आणि या क्षेत्रात नवीन प्रकल्पही सुरू होत आहेत. यामुळे या क्षेत्रात वाढीची शक्यता टाटाला वाटत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:22 PM2022-08-18T16:22:44+5:302022-08-18T16:59:16+5:30

सध्या गृहनिर्माण क्षेत्रात किमती कमी आहेत, गृहकर्जाचे दरही कमी आहेत, अधिकाधिक शहरीकरण होत आहे आणि या क्षेत्रात नवीन प्रकल्पही सुरू होत आहेत. यामुळे या क्षेत्रात वाढीची शक्यता टाटाला वाटत आहे. 

Tata MF launches new mutual fund in Housing sector; An opportunity for investors to make money | Tata Mutual Fund: टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

Tata Mutual Fund: टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

गुंतवणुकीच्या संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. य़ेत्या काळात हाऊसिंग सेक्टरमध्ये पैसे गुंतविण्याची तुमची इच्छा असेल तर टाटा एमएफने नवीन हाऊसिंग फंड लाँच केला आहे. टाटाने यापूर्वीच या कॅटेगरीत दोन फंड लाँच केले आहेत. 

टाटा हाउसिंग अपॉर्च्युनिटी फंड हा घरांमध्ये मागणी येण्याच्या अंदाजाने आणण्यात आला आहे. हा फंड संपूर्णपणे हाऊसिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार नाही, तर घरे बांधण्याच्या व्यवसायाशी संबंधित कंपन्यांमध्येही गुंतवणूक करेल. टाटा एमएफला यापेक्षा चांगल्या रिटर्नची अपेक्षा आहे.

हाऊसिंग कॅटेगरीतील जुन्या फंडांनी जास्त परतावा दिलेला नाही. असे असताना देखील थोडे लक्ष्य बदलून हा फंड आणण्यात आला आहे. हा नवा फंड १६ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा फंड निफ्टीच्या हाऊसिंग इंडेक्सवर आधारित असणार आहे, यामध्ये ५० स्टॉक आहेत. परंतु हा फंड मोठ्या आणि अधिक स्टॉक आणि व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल. हाऊसिंग क्षेत्रातील वाढत्या मागणीच्या काळात चांगला परतावा देऊ शकतो. 

सध्या गृहनिर्माण क्षेत्रात किमती कमी आहेत, गृहकर्जाचे दरही कमी आहेत, अधिकाधिक शहरीकरण होत आहे आणि या क्षेत्रात नवीन प्रकल्पही सुरू होत आहेत. यामुळे या क्षेत्रात वाढीची शक्यता टाटाला वाटत आहे. 
 
Web Title: Tata MF launches new mutual fund in Housing sector; An opportunity for investors to make money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.