Lokmat Money >म्युच्युअल फंड > ‘या’ Mutual funds ने बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, साडेतीन वर्षांत पैसे झाले दुप्पट

‘या’ Mutual funds ने बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, साडेतीन वर्षांत पैसे झाले दुप्पट

म्युच्युअल फंडाकडे (Mutual Funds) लोकांचा कल अलीकडे खूप वाढला आहे. पाहा कोणते आहेत हे फंड.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 02:51 PM2022-10-08T14:51:38+5:302022-10-08T14:52:33+5:30

म्युच्युअल फंडाकडे (Mutual Funds) लोकांचा कल अलीकडे खूप वाढला आहे. पाहा कोणते आहेत हे फंड.

These mutual funds changed the fortunes of investors the money doubled in three and a half years multi bagger returns investment tips | ‘या’ Mutual funds ने बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, साडेतीन वर्षांत पैसे झाले दुप्पट

‘या’ Mutual funds ने बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, साडेतीन वर्षांत पैसे झाले दुप्पट

म्युच्युअल फंडाकडे (Mutual Funds) लोकांचा कल अलीकडे खूप वाढला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यात मिळणारा मोठा परतावा. क्वांट म्युच्युअल फंड योजनेने अलीकडेच आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. पाहूया क्वांट म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि त्यांनी अलीकडे किती परतावा दिला आहे.

सामान्य फंडाच्या तुलनेत हे पूर्णपणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात मॅन्युअल हस्तक्षेप होत नाही. साधारणपणे असे दिसून येते की फंड मॅनेजरला एखादा स्टॉक खूप आवडतो आणि तो त्यात गुंतवणूक करत राहतो. फंड मॅनेजरच्या या प्रवृत्तीचा फटका अनेकवेळा गुंतवणूकदारांना सहन करावा लागतो. परंतु क्वांट फंड आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित असल्याने अशा पूर्वाग्रहांपासून मुक्त राहतात.

कोणकोणतेक्वांटम्युच्युअलफंड?
क्वांट टॅक्स प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह प्लॅन, क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड यांनी चांगली कामगिरी केली आहे. या म्युच्युअल फंडांनी केवळ 3.5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. क्वांट टॅक्स प्लॅन ग्रोथ प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह फंडाने गेल्या 5 वर्षांमध्ये 22 टक्क्यांपेक्षा क्जास्त सीएजीआर दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंड ग्रोथ प्लॅनचा सीएजीआर 21.50 टक्क्यांहून अधिक आहे आणि क्वांट मिड कॅप फंड ग्रोथचा गेल्या 5 वर्षांत 20 टक्क्यांहून अधिक सीएजीआर आहे.

लाखाच्या गुंतवणूकीवर किती परतावा?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी क्वांट टॅक्स प्लॅनमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचा परतावा आता 2.71 लाख रुपये झाला असता. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचा परतावा आता 2.60 लाख रुपये झाला असता. त्याचप्रमाणे, ज्याने 5 वर्षांपूर्वी क्वांट मिड कॅप फंडमध्ये पैसे टाकले असते, तर त्याचा परतावा आता 2.55 लाख रुपये झाला असता.

सर्वठळकबातम्यांसाठीजरूरवाचामहाराष्ट्रातीलअव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: These mutual funds changed the fortunes of investors the money doubled in three and a half years multi bagger returns investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.