Lokmat Money >म्युच्युअल फंड > कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत

कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत

Large Cap Mutual Funds : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गमावण्याचा धोका वाटत असेल तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:00 IST2025-01-30T17:00:17+5:302025-01-30T17:00:59+5:30

Large Cap Mutual Funds : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गमावण्याचा धोका वाटत असेल तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.

top 7 large cap mutual funds gave high returns in the past 10 years | कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत

कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत

Large Cap Mutual Funds : सध्या शेअर बाजारातगुंतवणूक म्हणजे खवळलेल्या समुद्रात जहाजात बसणे आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मार्केटचा धोका कमी करुन चांगला परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडसारखा पर्याय नाही. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावरुन हा पर्याय लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आपण टॉप ७ फंडाची माहिती घेऊ. ज्यांनी मागील १० वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

कोणता म्युच्युअल फंड सुरक्षित?
इक्विटीमधील सर्वात सुरक्षित म्युच्युअल फंड श्रेणी म्हणजे लार्ज-कॅप फंड. या फंडांद्वारे दिलेला सरासरी परतावा इतरांच्या तुलनेत कमी असेल. मात्र, तो अधिक स्थिर असतो. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड एका कदाचित तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त देतील. मात्र, ते लवकर पडूही शकतात. अशा परिस्थितीत, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप स्टॉक्स किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंडांचा समावेश असावा. जेणेकरून वर्षभर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त चढ-उतार होणार नाहीत, असे तज्ञांचे मत आहे.

ICICI Prudential Bluechip Fund
ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडाने गेल्या १० वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना १२.५३ टक्के परतावा दिला आहे. या फंडाची AUM ६१७१४.९९ कोटी आहे.

Nippon India Large Cap Fund
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १२.४६ टक्के परतावा दिला आहे. या फंडाचे मुल्य ३४५१७.६३ कोटी रुपये आहे

Canara Robeco Bluechip Equity Fund
कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १२.०७ टक्के परतावा दिला आहे. या फंडाकडे १४,१९६.७८ कोटी रुपये भांडवल आहे.

SBI Bluechip Fund
एसबीआय ब्लूचिप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ११.६२ टक्के परतावा दिला आहे. या फंडाची AUM रुपये ४८०६२.०६ कोटी आहे.

Edelweiss Large Cap Fund
एडलवाईस लार्ज कॅप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ११.४० टक्के परतावा दिला आहे. या फंडाचे मुल्य १०७८.११ कोटी रुपये आहे.

Kotak Bluechip Fund
कोटक ब्लूचिप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ११.२४ टक्के परतावा दिला आहे. या फंडाकडे ९,०२५.४७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

HDFC Large Cap Fund
HDFC लार्ज कॅप फंडाने गेल्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ११.१० टक्के परतावा दिला आहे. या फंडाची AUM ४,८४७.८२ कोटी रुपये आहे.

(Disclaimer : यामध्ये म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: top 7 large cap mutual funds gave high returns in the past 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.