गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने सातत्याने जोरदार प्रगती नोंदवली आहे आणि आता चार ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या गटात भारतीय अर्थव्यवस्था गणली जाते. कालांतराने 5 ट्रिलियन डॉलर कडे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू होणार आहे. आर्थिक प्रगती समृद्धी आणि भरभराटीच्या नव्या युगाकडे आपली वाटचाल सुरू झालेली असताना मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या भरभराटीच्या कालावधीचा फायदा व्हावा यासाठीच ॲक्सिस म्युच्युअल फंडाचा हा फंड अत्यंत योग्य पर्याय म्हणून समोर येत आहे.
इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी याची प्रमुख पाच कारणे पुढीलप्रमाणे
इंडिया ग्रोथ स्टोरी आणि इंडेक्स फंड : इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जानेवारी 2024 या महिन्यात एक आकडेवारी जाहीर केली त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगवान दराने वाढत जाणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे असे भाकीत नोंदवले आहे. एक एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या वित्त वर्षासाठी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जीडीपीची वाढ साडेसहा टक्के इतकी राहण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे. भारतातील उत्पादन, सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये सतत होत असलेली वाढ लक्षात घेता जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे इंजिन म्हणूनच भारत उदयास येणार आहे आणि जसे भारताचे अर्थव्यवस्थेतील जागतिक स्थान बळकट होईल तसे या फंडामार्फत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना या लाभाचा फायदा मिळेल.
सर्व सेक्टर्समध्ये गुंतवणुकीची संधी : एस अँड पी बी एस इ सेन्सेक्स एकूण 30 कंपन्यांनी बनलेला असतो. यामधील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, लार्सन अँड टू ब्रो, रिलायन्स अशा निवडक कंपन्यांची एकूण कामगिरी लक्षात घेता भारताच्या बाजाराच्या 40% एवढे त्या कंपन्यांचे बाजार मूल्य भरते. इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना वित्तीय सेवा, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, उपभोग्य वस्तू अशा सर्वच क्षेत्रांमध्ये एका वेळी गुंतवणूक करता येते.
आपली गुंतवणूक अनेक ठिकाणी ठेवणे हे कायमच योग्य असते. इंडेक्स फंड बाजारातील आघाडीच्या 30 कंपन्या निवडत असल्यामुळे आपोआपच गुंतवणूकदारांच्या पैशांच्या जोखमीचे विभाजन होते आणि सर्व क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. यामध्ये एफएमसीजी, टेलिकॉम, ऊर्जा, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू, खाणकाम आणि खनिज संपत्ती, रसायन उद्योग अशा सर्वांचा समावेश होतो.
कमी खर्चात गुंतवणूक :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना महत्त्वाचा असतो तो एक्सपेन्स रेशो. जेवढा एक्सपेन्स कमी तेवढा फंड योजनेचा रिटर्न चांगला मिळतो. म्युच्युअल फंडातील इंडेक्स फंड कोणत्या तरी इंडेक्सला फॉलो करतात, त्यामुळे त्या इंडेक्समध्ये जसे शेअर्स असतात तसेच या फंड मॅनेजरला ते निवडायचे असतात म्हणून गुंतवणुकीमध्ये एक शिस्तबद्धता येते. बाजार कसेही असले, तेजी-मंदीचे चक्र सुरू असले तरी गुंतवणूक त्याच तीस कंपन्यांमध्ये त्याच प्रमाणात करायची असते. कमी एक्सपेन्स रेशो असल्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो.
इंडेक्स फंड आणि संपत्ती निर्मिती :इंडेक्स फंड ही संकल्पना जुनी असली तरी गेल्या दहा वर्षात गुंतवणूकदारांची पसंती इंडेक्स फंडांना मिळते आहे. पॅसिव्ह स्ट्रॅटेजी म्हणजेच ठरवलेल्या इंडेक्सला समोर ठेवून गुंतवणूक करणे या रणनीतीमुळे पोर्टफोलिओमध्ये कायमच शिस्तबद्ध गुंतवणूक केली जाते. इंडेक्स फंडातील एकूण असेट्स अंडर मॅनेजमेंट मागच्या सात वर्षात दसपटीने वाढले आहेत. यावरूनच गुंतवणूकदारांच्या पसंतीचा अंदाज येतो.
इंडेक्स फंडाचा भूतकाळातील चांगला परतावा : बीएसई सेंसेक्सने गेल्या दहा ते पंधरा वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये आणि जगाच्या पातळीवर उतार चढाव येत असले तरी कायमच वार्षिक सरासरी परतावा उजवा दिला आहे. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी सेन्सेक्स मधील कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करणारा इंडेक्स फंड कायमच लॉंग टर्म मध्ये संपत्ती निर्माण करणारा ठरणार आहे.
म्हणूनच ॲक्सिस फंड भारतीय अर्थव्यवस्थेत होणारी वाढ हेरून गुंतवणूकदारांना त्याचा थेट फायदा करून देण्यासाठी महत्त्वाचा फंड ठरणार आहे. ज्यांना भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांवर पूर्ण आत्मविश्वास आहे व भविष्यात भारताची अर्थव्यवस्था दर्जेदार प्रगती करेल यात शंकाच नाही अशा कॉन्फिडंट गुंतवणूकदारांनी या फंड योजनेची निवड करणे आवश्यक आहे.
ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप मधील विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करतात व यासाठी त्यांना कंपन्या निवडताना स्वतःचा अभ्यास आणि बाजारपेठेचा अंदाजही लावावा लागतो. याउलट इंडेक्स फंडामध्ये सेन्सेक्स मधल्या त्याच 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असल्याने जोखीम कमी होते.
सेन्सेक्स मधील कंपन्या लीडर्स असतात यामुळे जरी बाजारात चढ-उतार आले तरी पुन्हा सेन्सेक्स कंपन्या बाजार वर घेत जाताना सर्वप्रथम चांगले रिटर्न देतात असा अनुभव आहे.
>> रिस्को मिटर विचारात घेता या फंड योजनेची Very High या सदरात गणना करण्यात येईल.
>> हा ओपन इंडेड स्वरूपाचा फंड असल्याने गुंतवणूकदारांना गुंतवण्याचे आणि गुंतवलेली रक्कम विकून पैसे परत घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
>> अस्वीकृती - भूतकाळातील फंड योजनेचा किंवा बाजारांचा परतावा भविष्यात असाच कायम राहील याची खात्री देता येणार नाही.
>> म्युच्युअल फंड गुंतवणुकी बाजार जोखमीच्या अधीन आहेत, गुंतवणूकदारांनी योजनेविषयीचे सर्व दस्ताऐवज वाचून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
ॲक्सिस म्युचल फंड इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली ट्रस्टी कंपनी आहे. ॲक्सिस बँक हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
विश्वस्त - ॲक्सिस म्युच्युअल फंड ट्रस्टी लिमिटेड.
गुंतवणूक व्यवस्थापक - ॲक्सिस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड.
जोखीम विषयक माहिती - ॲक्सिस बँक लिमिटेड या कंपनीचा फंड योजनेच्या परताव्याशी व त्यामुळे उद्भवणाऱ्या जोखमेशी कोणताही संबंध नाही.