जीवनातील आर्थिक समस्या दूर करून चांगलं जीवन जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुमच्याकडे मोठा फंड असणं आवश्यक आहे आणि फंड जमा करण्याचा मार्ग म्हणजे गुंतवणूक. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता. परंतु यासाठी ती स्कीमही निवडणं तितकच महत्त्वाचं आहे जिथून तुम्हाला बंपर परतावा मिळेल. आज आपण अशाच एका स्कीम आणि खास फॉर्म्युलाबाबत जाणून घेणार आहोत जे तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी कोट्यधीश बनवू शकतं.
होऊ शकता कोट्यधीश
कोट्यधीश होणं हे रॉकेट सायन्स नाही, यासाठी तुम्हाला फक्त योग्य गुंतवणूक धोरणाचा अवलंब करावा लागेल. अशा परिस्थितीत 12-15-20 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये 12 म्हणजे 12% परतावा, 15 म्हणजे 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि 20 म्हणजे 20,000 रुपये मासिक गुंतवावे लागतील. या फॉर्म्युल्यासह, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी स्वतःला कोट्यधीश बनवू शकता.
कुठे कराल गुंतवणूक?
आता प्रश्न पडतो की गुंतवणूक कुठे करायची, कुठून 12 टक्के परतावा मिळेल. उत्तर याचं उत्तर आहे एसआयपी (SIP). तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड हे मार्केट लिंक्ड असतात, त्यामुळे त्याचा परतावा निश्चित नसतो. परंतु आर्थिक तज्ज्ञांच्या मते यात दीर्घकाळात सरासरी किमान 12 टक्क्यांचा परतावा मिळतो. कधीकधी तो यापेक्षा जास्तही असू शकतो.
असे बनाल कोट्यधीश
तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दर महिन्याला 20,000 रुपये जमा केल्यास, तुम्ही 15 वर्षांत एकूण 36,00,000 रुपये गुंतवाल. एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, तुम्हाला 12 टक्के दरानं 64,91,520 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, 15 वर्षांनंतर तुम्ही एकूण 1,00,91,520 रुपयांचे मालक व्हाल.
20000 कसे जमवाल?
आणखी एक गोष्ट मनात येते की गुंतवणुकीसाठी 20,000 रुपये कसे उपलब्ध जमतील. जर तुमचा पगार 65 ते 70 हजार दरम्यान असेल तर तुम्ही दरमहा 20,000 रुपये सहज काढू शकता. आर्थिक नियम सांगतात की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कमाईतील किमान 30 टक्के गुंतवणूक करावी. जर तुम्ही दरमहा 65,000 रुपये कमावले तर त्यातील 30 टक्के म्हणजे 19,500 रुपये म्हणजेच जवळपास 20,000 रुपये. अशा परिस्थितीत तुम्ही ही रक्कम गुंतवणुकीसाठी सहज काढू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)