Lokmat Money >म्युच्युअल फंड > बँक अकाऊंटला पैसे नसल्याने SIP चा हप्ता चुकला? योजना बंद होणार? जाणून घ्या, काय होईल

बँक अकाऊंटला पैसे नसल्याने SIP चा हप्ता चुकला? योजना बंद होणार? जाणून घ्या, काय होईल

Mutual Fund: SIP चा हप्ता जाण्याच्या दिवशीच बँकेत पैसे नसल्यामुळे पेमेंट चुकले, तर पुढे काय होईल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? पाहा, संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:54 PM2022-08-19T16:54:33+5:302022-08-19T16:55:56+5:30

Mutual Fund: SIP चा हप्ता जाण्याच्या दिवशीच बँकेत पैसे नसल्यामुळे पेमेंट चुकले, तर पुढे काय होईल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? पाहा, संपूर्ण डिटेल्स

what happens if you miss mutual fund sip payment due to lack of balance in bank account know all details | बँक अकाऊंटला पैसे नसल्याने SIP चा हप्ता चुकला? योजना बंद होणार? जाणून घ्या, काय होईल

बँक अकाऊंटला पैसे नसल्याने SIP चा हप्ता चुकला? योजना बंद होणार? जाणून घ्या, काय होईल

भारतात आताच्या घडीला नानाविध प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत. प्रत्येक जण आपापल्यापरिने गुंतवणूक करत असतो. मात्र, या अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. (Mutual Fund) एकदा म्युच्युअल फंडाचा फंडा डोक्यात फिक्स झाला की मग अजिबात मागे वळून पाहायला नको. दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवण्याची इच्छा असलेल्यांसाठी सिस्टिमॅटिक लोकांसाठी एक प्लान आहे याला म्हणतात एस.आय.पी. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपी (SIP) द्वारे गुंतवणूक करत असाल तर दर महिन्याला ठराविक तारखेला एसआयपीचे पैसे तुमच्या बँक खात्यातून कापले जातात. कधी असे होऊ शकते की एसआयपी पेमेंटच्या तारखेला तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत एसआयपी पेमेंट चुकले तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. 

एसआयपी पेमेंट चुकले तरी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही एका महिन्यात तुमचे एसआयपी पेमेंट चुकवल्यास फंड हाऊस तुम्हाला त्यासाठी कोणताही दंड आकारत नाही. पण, असे वारंवार घडणे योग्य नाही. तुम्ही सलग तीन वेळा एसआयपी पेमेंट चुकवल्यास फंड हाऊस तुमची एसआयपी रद्द करते. 

पेमेंट चुकवल्याबद्दल बँक तुमच्याकडून दंड आकारू शकते

एसआयपी पेमेंट चुकवल्याबद्दल तुमची बँक तुमच्याकडून दंड आकारु शकते. दंडाची रक्कम बँकेनुसार बदलते. हा दंड १५० ते ७५० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला एसआयपी पेमेंटची तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तारखेपूर्वी तुम्ही तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे ठेवले पाहिजेत. तुमची बँक तुम्हाला एसआयपी पेमेंटच्या तारखेपूर्वी स्मरणपत्र पाठवते.

तुमच्या गुंतवणुकीवरही परिणाम होईल

गुंतवणुकीच्या कालावधी दरम्यान तुम्ही तुमचे SIP पेमेंट चुकवल्यास त्याचा तुमच्या गुंतवणुकीवरही परिणाम होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीसह तुमचा परतावा कमी होऊ शकतो. दुसरीकडे बँकेने दंड ठोठावल्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होते. अशा परिस्थितीत तुम्हाला SIP द्वारे गुंतवणुकीचा पूर्ण लाभ मिळत नाही. यामुळे तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्टही पूर्ण होणार नाही, असे सांगितले जाते. 

दरम्यान, पैशाच्या समस्येमुळे एसआयपी पेमेंट चुकत असेल तर त्यावर उपाय आहे. फंड हाऊसला कळवून तुम्ही तुमची एसआयपी काही काळ थांबवू शकता. बहुतेक फंड हाऊसेस गुंतवणूकदारांना ही सुविधा देतात. पैशाची अडचण संपल्यावर तुम्ही SIP पुन्हा सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला फंड हाऊसला कळवावे लागेल. एसआयपी थांबवण्यासाठी तुम्हाला किमान ३० दिवस आधी फंड हाऊसला विनंती पाठवणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन विनंती फंड हाऊसला पाठवू शकता. SIP थांबवल्यानंतरही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळत राहील.
 

Web Title: what happens if you miss mutual fund sip payment due to lack of balance in bank account know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.