Lokmat Money >म्युच्युअल फंड > Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधी आणि कशासाठी करायची? निमित्त लागणार की आताच सुरु करणार...

Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधी आणि कशासाठी करायची? निमित्त लागणार की आताच सुरु करणार...

तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे, तीन वर्षात बुलेट घ्यायची किंवा आई-बाबांना घेऊन मस्त फिरायला जायचंय? थोडेसे पैसे दर महिन्याला जमतात?  कधी कधी जास्त  जमतात?  गुंतवा म्युच्युअल फंडात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:03 AM2022-08-12T10:03:15+5:302022-08-12T10:04:07+5:30

तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे, तीन वर्षात बुलेट घ्यायची किंवा आई-बाबांना घेऊन मस्त फिरायला जायचंय? थोडेसे पैसे दर महिन्याला जमतात?  कधी कधी जास्त  जमतात?  गुंतवा म्युच्युअल फंडात!

When and why to invest in mutual funds? you will start now if you need an excuse... | Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधी आणि कशासाठी करायची? निमित्त लागणार की आताच सुरु करणार...

Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधी आणि कशासाठी करायची? निमित्त लागणार की आताच सुरु करणार...

म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांना अप्रत्यक्षरीत्या शेअर बाजारात व रोखे बाजारात गुंतवणूक करून देण्याची संधी देणारी योजना होय. तुमच्या गरजेनुसार फंड निवडावा. याचा अभ्यास करावा लागणार आहे. फंड मॅनेजर म्हणजेच निधी व्यवस्थापक आणि त्याच्या हाताखाली असलेली तज्ज्ञ मंडळी बाजाराचा व्यवस्थित अभ्यास करून तुमचे पैसे कसे गुंतवायचे? याचा निर्णय घेतात. पैसे कधी गुंतवावेत?  याचा निर्णय प्रत्येक व्यक्ती आणि त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे.

दरमहा थोडे थोडे पैसे गुंतवता येतात. दहा-पंधरा वर्ष गुंतवणूक करून त्याचे रिटर्न मिळविता येतात. तुम्हाला दोन-तीन महिन्यांनी पैसे लागणार आहेत? मग हे पैसे बचत खात्याते ठेवून किती व्याज मिळणार? त्यापेक्षा फंडात पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवू शकता. 
तुमच्या घरात एका चिमुकल्या बाळाचा जन्म झाला आहे, त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे आहेत? तर मग गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे! अगदी हळू हळू सावकाश फंड वाढू दे! जशी तुमच्या मुलाची किंवा मुलीची वाढ होईल तसा फंड सुद्धा वाढेल. पन्नाशी जवळ येत चालली आहे, आता रिटायरमेंट दिसायला लागली? रिटायर झाल्यावर पेन्शन नाहीये? मग दर महिन्याला थोडे थोडे पैसे लागणारच की हो! आत्तापासूनच फंडात पैसे गुंतवा आणि हळूहळू तुमच्याच रिटायरमेंटची तुम्हीच छानशी सोय करा.

तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे, तीन वर्षात बुलेट घ्यायची किंवा आई-बाबांना घेऊन मस्त फिरायला जायचंय? थोडेसे पैसे दर महिन्याला जमतात?  कधी कधी जास्त  जमतात?  गुंतवा म्युच्युअल फंडात! अपेक्षित वाढ मिळाली की फंड विकून टाका आणि पैसे खात्याला जमा करा.

अचानक अपेक्षेपेक्षा जास्त बोनस कंपनीने दिला?  उगाचच कुठेतरी खर्च होतो?  तीन ते पाच वर्षासाठी पैसे गुंतवून ठेवले तर कुठेतरी नक्कीच वापरता येतील असा विचार मनात आलाय? मग थोडी कमी जोखीम असलेल्या एखाद्या फंडात पैसे गुंतवायला काय हरकत आहे?
थोडक्यात काय!  तुमचं वय कितीही असो, तुमचं बजेट कितीही असो आणि तुमची गरज वेगवेगळी! असो प्रत्येकाच्या गरजा ओळखून म्युच्युअल फंड आपापल्या योजना जाहीर करतात. मग करायला हवी म्युच्युअल फंडात गुंतवणूक!

Web Title: When and why to invest in mutual funds? you will start now if you need an excuse...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.