Join us

Investment In Mutual Fund: म्युच्युअल फंडात पैसे कुणी गुंतवावेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:12 AM

Investment In Mutual Fund: म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे!

पैसा कमावणे हे जेवढं कठीण काम एवढच मिळालेला पैसा कुठे गुंतवायचा? हे दुसरं कठीण काम!  बरं आपण गुंतवलेला पैसा हा ज्याच्याकडे देतोय , ज्या कंपनीत गुंतवतो ती अधिकृत आहे ना?  का तुमचे पैसे परस्पर घेऊन कोणीतरी लंपास होणार आहे? या सगळ्यापासून दूर जावं आणि पैसे एखाद्या बँकेत गुंतवावेत तर ही बँक बुडेल की काय अशी शंका! राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे ठेवले तर त्या बँका सरकारी असल्यामुळे पैसे बुडत  नाहीत पण मिळणारे व्याज कमी, त्यांनी आपली गरजही भागत नाही! देशातील अनेकविध गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी सर्वाधिक लोकप्रिय होत चाललेला पर्याय आणि एक हक्काचा साथीदार म्युच्युअल फंड. (Mutual Fund).  

म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार, रोखे बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याचा राजमार्ग होय. शेअर बाजारात थेट पैसे गुंतवायची जोखीम घ्यायला बरेच जण घाबरतात. बऱ्याच वेळेला त्यांना शेअर बाजाराचं ज्ञान नसतं. नक्की काय वाचायचं?, कुठे वाचायचं?, कसं समजून घ्यायचं?  हे सुद्धा माहित नसतं. अशा वेळेला म्युच्युअल फंड तुमच्या मदतीला येतात. एका तज्ञ माणसाच्या हाताखाली एक टीम काम करते आणि तुमचा पैसा तुम्हाला अपेक्षित असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवला जातो. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे! कोणीही! हो!

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. अगदी 18 वर्षे पूर्ण झालेली असोत किंवा नसो. पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर कोणताही भारतीय नागरिक, कंपनी, संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, पार्टनरशिप फॉर्म अशा सगळ्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने गुंतवणूक करत असेल आणि ज्याच्या नावाने गुंतवणूक करायची ती व्यक्ती सज्ञान नसेल तर जॉईंट स्वरुपात सुद्धा गुंतवणूक करता येते. 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक