योग गुरू बाबा रामदेव यांनी कोट्यवधी रुपयांच्या पतंजलीच्या खऱ्या मालकासंदर्भात नुकतेच भाष्य केले आहे. बाबा रामदेव हे केवळ जगप्रसिद्ध योगगुरूच नाहीत, तर एक यशस्वी उद्योगपतीही आहेत. त्यांनी केवळ योगाचा प्रसार जगभरात केला नाही, तर त्यांनी भारतातील स्वदेशी ब्रँड पतंजली आयुर्वेदाचेही व्यवसायिक साम्राज्यात रूपांतर केले. या पतंजलीचे खरे मालक बाबा रामदेव आहेत, असे अनेक जण मानता. पण, नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेदाचा खरा मालक कोण? हे योग गुरूंनी सांगिले आहे.
किती मोठा एह पतंजली उद्योग? -
पतंजली खाद्यपदार्थ आणि सौंदर्य उत्पादनांव्यतिरिक्त, पतंजलीच्या देशभरात योग ग्राम, निरामयम, पतंजली योगपीठ, आचार्यकुलम आणि पतंजली विद्यापीठासह 100 हून अधिक संस्था आहेत. योग आणि आयुर्वेदावर आधारित पतंजलीचा व्यवसाय येत्या पाच वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपच्या वर नेण्याचा बाबा रामदेव यांचा प्रयत्न आहे. पतंजली फूड्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, त्याचे मार्केट कॅप ₹ 67535 कोटी एवढे आहे.
पतंजलीचा खरा मलाक कोण? -
हजारो कोटी रुपयांच्या पतंजली साम्राज्याचा खरा मालक बाबा रामदेव अथवा आचार्य बाळकृष्ण नाहीत, असे रामदेव यांनी म्हटले आहे. तर, या कंपनीचा खरा मालक संपूर्ण देश आणि देशातील जनता असल्याचे योगगुरूंनी म्हटले आहे. ते म्हणाले, पतंजलीचे संपूर्ण साम्राज्य देश आणि देशातील जनतेचे आहे आणि तेच त्याचे लाभार्थी तथा खरे मालकही आहेत.
पतंजलीवर काही लोकांची वाईट नजर -
बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, पतंजलीच्या लाखो कोटींच्या साम्राज्यावर लोकांची वाईट नजर आहे. एवढी मोठी संस्था आम्ही कशी उभी केली? याचे लोकांना आश्चर्य वाटते. तसेच, पतंजलीने देशभरात 100 हून अधिक मोठ्या संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांचा उद्देश योगाला नव्या उंचीवर नेणे आहे, असेही बाबा रामदेव म्हणाले.