Join us  

नेटफ्लिक्स नरमली? पैसे न भरता फ्री पाहता येणार, फक्त युट्यूबसारखी अ‍ॅड दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 2:15 PM

तसेही टीव्हीवरही पैसे मोजून अ‍ॅड पहाव्याच लागतात. तसेच नेटफ्लिक्स करणार आहे.

सर्वात महागचा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने नरमाईची भुमिका घेतली आहे. प्लॅन महाग करून, शेअरिंग थांबवून नेटफ्लिक्सने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. आता या कंपनीला उपरती होत असून नेटफ्लिक्स फ्री करण्याचा विचार सुरु केला आहे. यासाठी युट्यूबसारख्या जाहिराती मात्र पहाव्या लागू शकतात. 

जाहिरात पहा, नेटफ्लिक्स फ्री मिळवा असा कंपनीचा प्लॅन आहे. यानुसार युजर्सना अ‍ॅड मात्र पहाव्या लागणार आहेत. तसेही टीव्हीवरही पैसे मोजून अ‍ॅड पहाव्याच लागतात. तसेच नेटफ्लिक्स करणार आहे. यातून सबस्क्रिप्शनचा जो पैसा कंपनीला मिळणार नाही तो अ‍ॅडच्या माध्यमातून गोळा केला जाणार आहे. कदाचित हा पैसा सबस्क्रिप्शनपेक्षाही कित्येक पटींनी जास्त असणार आहे. 

हा प्लॅन काही निवडक बाजारात लाँच केला जाणार आहे. अमेरिकेत कंपनी अशा प्रकारचा प्लॅन विकते. यातून कंपनी अ‍ॅडद्वारे करोडो डॉलर कमावते जे सबस्क्रिप्शन अमाऊंटपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत. 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार नेटफ्लिक्स आशिया आणि युरोपियन बाजारपेठांसाठी एक विनामूल्य योजना सादर करण्याचा विचार करत आहे. अनेक टीव्ही नेटवर्क या भागांमध्ये विनामूल्य योजना ऑफर करतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स मोफत मिळणार आहे. 

आपल्या प्लॅटफॉर्मवर दर्शकांची संख्या वाढवण्यासाठी ही योजना आणण्याचा नेटफ्लिक्सचा प्लॅन आहे. असे झाल्यास भारतात व उर्वरित आशियात नेटफ्लिक्स युट्यूब, हॉट स्टार सारख्या तगड्या ओटीटींना टक्कर देऊ शकणार आहे. 

टॅग्स :नेटफ्लिक्स