आतापर्यंत तुम्ही वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके आणि फोर बीएचके फ्लॅटबद्दल ऐकलं आणि पाहिलं असेल. पण आता आणखी एका फ्लॅटला आजकाल मोठी मागणी आली आहे. हे एक, दोन, तीन आणि चार नाही तर ०.५ बीएचके फ्लॅट आहेत. त्यांचा ट्रेंड जोर धरत आहे. सध्या लोकांची पसंती ०.५ बीएचके फ्लॅट्सना मिळत आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर त्यांची मागणी खूप वाढली आहे. कोरोना महासाथीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रातही बरेच बदल झाले आहेत. आता लहान फ्लॅट्स घेण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. बांधकाम व्यावसायिकही आता वर्क फ्रॉम होम नुसार जागा तयार करत आहेत. अशी मागणी घर खरेदीदारांकडून केली जात आहे. ०.५ बीएचके फ्लॅटची मागणीही महामारीनंतर लक्षणीय वाढली आहे.
कसे असतात ०.५ बीएचके फ्लॅट?
आता ०.५ बीएचके फ्लॅट्स तेजीनं तयार होऊ लागले आहेत. दरम्यान ०.५ बीएचके फ्लॅट्स/अपार्टमेंट सामान्य आकाराच्या घरांपेक्षा थोडे लहान आहेत. यात किचन आणि वॉशरूम/बाथरूम देखील आहे. हे लहान कुटुंबासाठी किंवा एकट्या व्यक्तीसाठी चांगले आहेत. मार्केट तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या काळापासून फ्लॅट्समध्ये थोडासा बदल झाला आहे. कोरोना महासाथीच्या काळात बहुतांश लोकांना घरातूनच काम करावं लागलं. अशा परिस्थितीत लोकांच्या गरजा काहीशा बदलल्या आहेत. सध्याही अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे.
महासाथीनंतर बदल?
कोरोना महासाथीनंतर घरांच्या डिझाईनमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. रिअल इस्टेट जाणकारांच्या मते आता कोरोना महासाथीनंतर लोकांना एका आणखी स्पेसची गरज वाटू लागली आहे, ज्या ठिकाणी बसून ते आपल्या ऑफिसची कामंही करू शकतात. ०.५ बीएचकेचा बदल यासाठीच करण्यात आला आहे. या ठिकाणी लोकांना ऑफिसच्या कामासाठी वेगळी स्पेस देण्यात येत आहे.
केले जातायत अनेक बदल
आता नवे फ्लॅट्स लाँच करण्यासोबतच बिल्डर्स लोकांसाठी एक ओपन स्पेस बनवत आहेत. या ठिकाणी हाय स्पीड इंटरनेटसह बसण्याचीही उत्तम व्यवस्था केली जात आहे. जर एखाद्या घरातील एकापेक्षा अधिक व्यक्ती वर्क फ्रॉम होम करत असतील तर त्यांना ओपन स्पेसमध्ये बसूनही काम करता येऊ शकतं. कोरोनाच्या महासाथीनंतर हे बदल केले जात आहेत.