Join us

६ महिन्यांत १.२० लाखांचे झाले १४ लाख; ₹७५ चा शेअर आता पोहोचला ₹९०० पार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 11:27 AM

सहा महिन्यांपूर्वी आलेल्या एका आयपीओनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

सहा महिन्यांपूर्वी आलेल्या एका आयपीओनं (IPO) गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. बोंदडा इंजिनिअरिंगचा  (Bondada Engineering) हा आयपीओ आहे. कंपनीचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी उघडला. आयपीओमध्ये बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सची किंमत 75 रुपये होती. जबरदस्त लिस्टिंगनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली. 7 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 910 रुपयांवर बंद झाले. बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राईजपेक्षा 1100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 949.95 रुपये आहे. त्याच वेळी, बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 142.50 रुपये आहे. 

1.20 लाख रुपयांचे झाले 14.56 लाख 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 18 ते 22 ऑगस्ट 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटसाठी बेट लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीमध्ये 1.20 लाख रुपये गुंतवावे लागले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स अलॉट झाले होते आणि त्यांनी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स ठेवले आहेत, त्यांना मोठा फायदा झालाय. 7 मार्च 2024 रोजी बोंडाडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 910 रुपयांवर बंद झाले. अशा परिस्थितीत, एका लॉटमध्ये मिळालेल्या 1600 शेअर्सचं सध्याचं मूल्य 14.56 लाख रुपयांवर पोहोचलं आहे. 

112 टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब 

बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण 112.28 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 100.05 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, आयपीओच्या इतर कॅटेगरीमध्ये 115.46 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओची साईज 42.72 कोटी रुपये होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 86 टक्के होता, जो आता 63.33 टक्क्यांवर आला आहे. 

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग