Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुटखा-पान थुंकीमुळे १,२०० कोटींचा फटका

गुटखा-पान थुंकीमुळे १,२०० कोटींचा फटका

गुटखा आणि पान खाण्यास बंदी नाही. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 10:05 AM2024-03-13T10:05:18+5:302024-03-13T10:05:49+5:30

गुटखा आणि पान खाण्यास बंदी नाही. 

1 200 crore hit due to gutkha pan spitting | गुटखा-पान थुंकीमुळे १,२०० कोटींचा फटका

गुटखा-पान थुंकीमुळे १,२०० कोटींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : प्रवाशांनी गुटखा आणि पान खाऊन थुंकून केलेली घाण साफ करण्यासाठी रेल्वेला २०२१ मध्ये तब्बल १,२०० कोटींचा फटका बसला. रेल्वेमध्ये सिगारेट आणि दारूस बंदी आहे. मात्र, गुटखा आणि पान खाण्यास बंदी नाही. 

त्यामुळे लोक गुटखा व पान खाऊन रेल्वेत थुंकून घाण करतात. याची साफसफाई हा आता रेल्वेसाठी जिकिरीचा विषय झाला आहे. पान व गुटख्यावर उपाय म्हणून रेल्वेने नागपूरच्या ईजीपिस्ट स्टार्टअप कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीने एक विघटनशील पिकदानी विकसित केली आहे. ती थुंकीला घन पदार्थात रूपांतरित करते. तसेच १५ ते २० वेळा तिचा थुंकण्यासाठी वापर करता येतो.

Web Title: 1 200 crore hit due to gutkha pan spitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे