Join us

1 एप्रिलपासून विम्याच्या हप्त्यात होईल घट, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:00 PM

1 एप्रिल 2019पासून जीवन सुरक्षा विम्याच्या हप्त्यामध्ये घट होणार आहे.

नवी दिल्ली- 1 एप्रिल 2019पासून जीवन सुरक्षा विम्याच्या हप्त्यामध्ये घट होणार आहे. त्यासाठी जीवन विमा कंपन्या आणि भारतीय विमा प्राधिकरणानं तयारी सुरू केली आहे. या बदललेल्या नियमांचा फायदा 22 ते 50 वर्षांच्या लोकांना होणार आहे. सर्व विमा कंपन्या 1 एप्रिलपासून मृत्युदराच्या नव्या आकड्यांचा वापर करणार आहे.आतापर्यंत विमा कंपन्या या 2006-08चा डेटाचा वापर करत होत्या. परंतु आता त्याच्याऐवजी 2012-14 डेटा वापरला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्चुअरिज ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2012-14च्या डेटानुसार 22 ते 50 वर्षांतील वयाच्या विमा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये 4 ते 16 टक्क्यांची घट झाली आहे.  नव्या बदलानुसार विमा पॉलिसी जास्त काढण्यात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याच्याच आधारावर विम्याचा हप्ता ठरवला जाणार आहे. ज्यात वय वर्षं 50 असलेल्या व्यक्तींना याचा फायदा मिळणार नाही.तसेच नव्या बदलानुसार वयोवृद्धांसाठीचा विमा हप्ता वाढणार आहे. रिपोर्टनुसार, 82 ते 105 वयाच्या लोकांचा मृत्यूदर 3 ते 21 टक्के वाढला आहे. तर विमा संरक्षण घेणाऱ्या महिलांच्या मृत्युदरात घट झाली आहे. यानुसार 14 ते 44 वर्षाच्या विमा संरक्षण घेणाऱ्या महिलांचा मृत्युदर 4.5 ते 17 टक्क्यांची सुधारणा नोंदवली गेली आहे.