वर्षाच्या अखेरच्या महिन्यास म्हणजेच डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. परंतु नव्या महिन्याच्या सुरूवातीलाच थोडा खिशावर अधिक भार पडणार आहे. दरम्यान, माचिससह दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी महाग होणार आहेत. पाहूया १ डिसेंबरपासून काय काय होणार महाग.माचिस महागणार : एक डिसेंबरपासून माचिसची किंमत १ रूपयांनी वाढणार आहे. या वाढीनंतर माचिसची किंमत २ रूपये होणार आहे. जवळपास १४ वर्षानंतर माचिसच्या किंमतीत वाढ होणार आहे. यापूर्वी २००७ मध्ये माचिसच्या किंमतीत ५० पैशांची वाढ करण्यात आली होती.PNB च्या ग्राहकांना झटका :पंजाब नॅशनल बँक (PNB) नं आपल्या बचत खातेधारकांना मोठा झटका दिला आहे. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आता व्याजदर वार्षिक २.९० टक्क्यांवरून कमी करून २.८० टक्के करण्यात आले आहेत. हे नवे दर १ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.SBI क्रेडिट कार्ड महाग : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचं तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर १ डिसेंबरपासून तुम्हाला झटका लागणार आहे. एसबीआयनं दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक खरेदीवर ९९ रूपये आणि जीएसटी हा वेगळा द्यावा लागणार आहे. हे प्रोसेसिंग शुल्क आहे.एलपीजीच्या किंमतीत बदल : डिसेंबर महिन्यात एलपीजीच्या किंमतीत बदल होऊ शकतात. यावेळी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय एटीएफ म्हणजेच जेट इंधनही महाग होऊ शकतं.
खिशाला लागणार कात्री; १ डिसेंबरपासून माचिसपासून क्रेडिट कार्डापर्यंत होणार महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 2:27 PM