Join us  

मोदी सरकारचा 1 निर्णय अन् रॉकेट बनला डिव्हिडंड देणाऱ्या सरकारी कंपनीचा शेअर; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 3:58 PM

कंपनी 5 रुपये फेस व्हेल्यू असलेल्या शेअरवर 4 रुपये प्रति शेअरनुसार, डिविडंड देईल. एक गुंतवणूकदाराला जवळपास 80 टक्क्यांचा डिव्हिडिंड मिळेल. या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 24 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज (16 फेब्रुवारी 2023) विंडफॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या कंपन्यांना होणार आहे. तिमाहीतील दमदार परिणाम आणि या निर्णयामुळे ओएनजीसीच्या शेअरच्या किंमतीत 4 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. दुपारी 1.15 च्या सुमारास कंपनीचा शेअर 153.50 रुपयांवर व्यवहार करत होता. महत्वाचे म्हणजे, ओएनजीसीने डिव्हिडिंड अथवा लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीचे जबरदस्त प्रदर्शन -सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तेल आणि नॅच्युरल गॅसच्या किमतीत वाढ केल्याने त्यांच्या निव्वळ नफ्यात 26 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने शेअर बाजाराला पाठविलेल्या पत्रात, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आपल्याला 11,044.73 कोटी रुपये अर्थात 8.78 रुपये प्रति शेअर एवढा शुद्ध नफा झाल्याचे म्हटले आहे. तर वर्षभरापूर्वी याच काळात हा नफा 8,763.72 कोटी रुपये अथवा 6.97 रुपये प्रति शेअर एवढा होता.

किती डिव्हिडंड देतेय कंपनी? - सरकारी कंपनी ओएनजीसीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी तिमाही परिणामांबरोबरच डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 5 रुपये फेस व्हेल्यू असलेल्या शेअरवर 4 रुपये प्रति शेअरनुसार, डिविडंड देईल. एक गुंतवणूकदाराला जवळपास 80 टक्क्यांचा डिव्हिडिंड मिळेल. या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 24 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारनरेंद्र मोदीगुंतवणूकशेअर बाजार