Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 राजीनामा अन् शेअर बाजारात उडाली खळबळ! गुंतवणूकदार सोडतायत या कंपनीची साथ, धाडकन कोसळली किंमत

1 राजीनामा अन् शेअर बाजारात उडाली खळबळ! गुंतवणूकदार सोडतायत या कंपनीची साथ, धाडकन कोसळली किंमत

गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा सर्वात मोठा राजीनामा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 02:41 PM2023-03-14T14:41:28+5:302023-03-14T14:53:13+5:30

गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा सर्वात मोठा राजीनामा...

1 Resignation and panic in the stock market Investors are leaving the infosys stock the price has fallen tremendously | 1 राजीनामा अन् शेअर बाजारात उडाली खळबळ! गुंतवणूकदार सोडतायत या कंपनीची साथ, धाडकन कोसळली किंमत

1 राजीनामा अन् शेअर बाजारात उडाली खळबळ! गुंतवणूकदार सोडतायत या कंपनीची साथ, धाडकन कोसळली किंमत

इन्फोसिसच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरापासून घसरण बघायला मिळत आहे. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या एका राजीनाम्याने खळबळ उडवून दिली आहे. यानंतर, दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. आज (मंगळवारी) इन्फोसिसचे शेअर्स 5 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. आज दुपारी 12.25 वाजता बीएसईवर इन्फोसिसचा शेअर 0.59 टक्क्यांनी घसरून 1426.35 रुपयांवर ट्रेड करत होता. 

कुणी दिला राजीनामा? - 
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनी म्हटले आहे की, कंपनीचे प्रेसिडेंट मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा 11 मार्च 2023 पासून लागू राहील. 9 जून 2023 ला मोहित जोशी यांचा कंपनीतील अखेरचा दिवस असेल. गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा सर्वात मोठा राजीनामा असून, या बातमीने शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. मोहित जोशी यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. मोहित हे ऑगस्ट 2016 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाला होते.

गेल्या महिनाभरात कंपनीचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले आहेत. विशेष म्हणजे या काळात सेन्सेक्स केवळ 5 टक्क्यांनीच कोसळला आहे. या आयटी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी गेला महिना ठीक राहिलेला नाही. कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी घसरली आहे. या काळात सेन्सेक्स केवळ 2.6 टक्क्यांनीच खाली आला आहे.
 

Web Title: 1 Resignation and panic in the stock market Investors are leaving the infosys stock the price has fallen tremendously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.